शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महानगरपालिकेने निविदा उघडल्या !

By admin | Updated: November 23, 2015 01:04 IST

कंत्राटदाराने केलेल्या कामाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने काही ठोस पावले उचलल्याने ....

नवीन कंत्राटदारांंना संधी : कंत्राटदार असोसिएशनचा बहिष्कार झुगारलाचंद्रपूर : कंत्राटदाराने केलेल्या कामाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने काही ठोस पावले उचलल्याने कात्रीत सापडलेल्या कंत्राटदारांनी एकवटून आपल्या काही मागण्या पुढे केल्या आणि मागण्या मान्य होत नाही म्हणून शनिवारी उघडण्यात आलेल्या ५५ निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र, कंत्राटदार असोसिएशनचा बहिष्कार झुगारुन मनपा प्रशासनाने निविदा उघडल्या. जवळपास ५० निविदा मंजूर झाल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते विकासाची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचे लक्षात आल्यावरुन मनपा प्रशासनाने या विरोधात कडक धोरण राबविण्याचा संकल्प केला आहे. केलेल्या कामाची जबाबदारी दोन वर्षापर्यंत कंत्राटदारांचीच राहील, अशी ताठर भूमिका घेतल्यामुळे अनेक कंत्राटदारांना ही बाब खटकली. तसेच निकृष्ठ कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर दंड ठोठावून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाविरोधात बहिष्काराचे शस्त्र उगारुन दबाव टाकण्याचा प्रयत्न कंत्राटदार असोसिएशनने केला. मात्र, मनपा कंत्राटदार असोसिएशनच्या बहिष्काराचा शनिवारच्या निविदांवर कोणताही परिणाम झाला नाही. ५५ कामांच्या निविदा उघडण्यात आल्या. यापैकी जवळपास ५० कामांच्या निविदा मंजूर केल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कंत्राटदार असोसिएशनमधील सहा-सात कंत्राटदारांकडे प्रत्येकी सात ते आठ कोटी रुपये किमतीची कामे आहेत. कोणत्याही कंत्राटदाराची बिले अडविण्यात आलेली नाही. ज्यांची कामे निकृष्ट दर्जाची दिसून आली, त्यांचीच बिले अडविण्यात आली आहेत. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांची बिले अडविणे ही बाब नियमाला धरुनच आहे. त्यामुळे कंत्राटदरांच्या दबावाला बळी न पडता निविदा उघडण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. काही मोजक्या कंत्राटदारांनी दबाव तंत्राचा वापर केल्याने त्यानिमित्ताने काही नवीन आणि गरजू कंत्राटदारांना कामे मिळाल्याचे समाधान आहे, असेही काहींचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेत कंत्राटदार असोसिएशनविरुद्ध प्रशासन असे चित्र राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)