शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा पाश सैल होतोय बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST

जिल्ह्यात गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ५९, बल्लारपूर तालुक्यातील चार, चिमूर-दोन, मूल-१४, गोंडपिपरी-पाच, जिवती-एक, कोरपना-एक, ब्रह्मपुरी-चार, नागभीड-नऊ, वरोरा-११, भद्रावती-१४, सावली-११, सिंदेवाही-१२, राजुरा तालुक्यातील एक, गडचिरोली दोन तर यवतमाळ येथील एक असे एकूण १५१ बाधित पुढे आले आहे.

ठळक मुद्दे१५१ नवे बाधित तर २७० कोरोनामुक्त : आतापर्यंत ८३६९ जणांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. गुरुवारी १५१ नवीन बाधितांची भर पडली असून २७० बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. आता बाधितांची एकूण संख्या ११ हजार ६२३ वर गेली आहे. तर आतापर्यंत आठ हजार ३६९ बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या तीन हजार ७४ बाधितांवर उपचार सुरू आहे.जिल्ह्यात गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ५९, बल्लारपूर तालुक्यातील चार, चिमूर-दोन, मूल-१४, गोंडपिपरी-पाच, जिवती-एक, कोरपना-एक, ब्रह्मपुरी-चार, नागभीड-नऊ, वरोरा-११, भद्रावती-१४, सावली-११, सिंदेवाही-१२, राजुरा तालुक्यातील एक, गडचिरोली दोन तर यवतमाळ येथील एक असे एकूण १५१ बाधित पुढे आले आहे.मृत्यूसंख्याही घटली, केवळ एकाचा मृत्यूजिल्ह्यात बाधितांसह आता मृत्यूसंख्याही घटत असताना दिसत आहे. गुरुवारी जिल्ह्यात केवळ एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितामध्ये, इंदिरा नगर, चंद्रपूर येथील ५३ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ४ आॅक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. या बाधिताला कोरोनासह न्यूमोनियाचा आजार होता. जिल्ह्यात आतापर्यंत १८० बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १७१ रुग्णांचा समावेश आहे.ग्रामीण भागातील बाधितबल्लारपूर तालुक्यातील कन्नमवार वार्ड, विद्या नगर वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील विरुर भागातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील बावणे लेआउट परिसर, आनंदवन, आंबेडकर वार्ड, विनायक लेआउट परिसर, सुभाष वार्ड, चिनोरा, जिजामाता वार्ड, माढेळी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधिनगर, मेढंकी, पिंपळगाव भोसले परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील बाजार वार्ड, पिपरबोरी, झिगुंजी वार्ड, गौतम नगर झाडे प्लॉट परिसर, श्रीराम नगर भागातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील अंतरगाव, वार्ड नंबर ८, कापसी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव, रत्नापूर, काचेपार भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील नवखळा, किटाळी, आकापुर, पार्डी, परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेताजी वार्ड, ठक्कर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील चिरोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.चंद्रपुरातील बाधितही कमी होतेयचंद्रपूर शहरातील व परिसरातील बाधितांची संख्याही आता कमी होत आहे. चंद्रपुरात शंभराच्या आतच बाधित आढळून येत आहे. गुरुवारी ५९ नवे बाधित आढळले. यात भिवापूर वार्ड, विवेकानंदनगर वडगाव, दादमहल वार्ड, गंज वार्ड, रयतवारी कॉलनी परिसर, दुगार्पुर, नगीना बाग,घुटकाळा वार्ड, तुकुम, अंचलेश्वर वार्ड, बाबुपेठ, दत्तनगर, सावरकर नगर, घुगुस, हनुमान मंदिर परिसर, सिस्टर कॉलनी, विठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या