गतवर्षी कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर ग्रामपंचायती, नगरपंचायत व नगर परिषदेच्या माध्यमातून कोविडविरुद्ध जनजागृती सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. लहान गावांचा तालुका स्थळाशी सतत संपर्क असतो. संपर्क साधनांमुळे तालुक्यांचाही जिल्हास्थळ व अन्य शहरांची जवळीकता वाढली. परंतु, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्याबाबत आजही पुरेशी जागृती झाली नाही. आठवडी बाजारांना परवानगी मिळाल्यानंतर शहरातील बरेच व्यावसायिक खेड्यातील आठवडीत बाजारात दुकाने थाटूू लागले. शिवाय, शेतीची कामे संपल्याने नागरिकांना रोजगारासाठी स्थलांतरण करावे लागले. मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना संसर्ग होऊ लागला. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्हची संख्या ४६ हजार ४४६ पर्यंत पोहोचली. त्यामध्ये ग्रामीण भागातील १६ हजार ७७३ पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६७१ बाधितांचा मृत्यू झाला, त्यामध्ये ग्रामीण भागातील २३९ मृतकांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात २३९ जणांचा कोरोनाने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST