शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात आलेली ‘ती’ पूर्ण ट्रॅव्हल्सच निघाली कोरोना संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:38 IST

राईस मिलच्या कामासाठी बिहार राज्यातून ६५ मजुरांना दोन ट्रॅव्हल्सच्या साहाय्याने आणण्यात आले. यातील एका ट्रॅव्हल्समध्ये असलेले सर्वच ३२ मजूर कोरोनाबाधित निघाले आहे.

ठळक मुद्दे६५ पैकी ३२ मजूर पॉझिटिव्ह शासकीय नियमांची राईस मिलमालकाकडून पायपल्ली

राजू गेडाम।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: राईस मिलच्या कामासाठी बिहार राज्यातून ६५ मजुरांना दोन ट्रॅव्हल्सच्या साहाय्याने आणण्यात आले. यातील एका ट्रॅव्हल्समध्ये असलेले सर्वच ३२ मजूर कोरोनाबाधित निघाले आहे.देशात कोरोनाने थैमान घातले असताना राईस मिल मालकाने पैसे कमाविण्याच्या नादात चक्क बिहार राज्यातून मजुरांना आणले. प्रशासनाच्या सर्व नियमाची पायमल्ली केल्याने मूल शहरात कोरोनाचा संक्रमण वाढले. मूल शहराबरोबरच तालुक्यातदेखील कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. जानाळा येथे झालेल्या लग्नसमारंभामुळे रूग्ण संक्रमित झाले. त्यानंतर ६५ मजूर राईस मिलच्या कामासाठी बिहार राज्यातून दोन टॅव्हल्सने आणण्यात आले.

यातील एका ट्रव्हल्समधील सर्वच ३२ मजूर पॉझिटिव्ह आले. ही संपूर्ण ट्रॅव्हल्सच कोरोना संक्रमित निघाली. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील एक परप्रांतीय मजूर आधीपासूनच मूल येथे वास्तवास होता तर राईस मिलमध्ये काम करणारा बोरचांदली येथील एका कर्मचाऱ्याचा स्वॅब अहवालदेखील पॉझिटिव्ह आलेला आहे. बोरचांदली येथील हा कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून धान खरेदी व इतर आनुषंगिक कामासाठी मूलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात व इतर गावात फिरून आपली कामे करीत होता. त्याचा अडते, व्यापारी यांच्यासह अनेकांशी संपर्क आलेला आहे.

तसेच याच राईस मिलजवळ चहाची टपरी चालविणाऱ्याचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील लोकांचादेखील स्वॅब घेण्यात येणार आहे. त्यामुळे संपर्कातील लोकांचे अहवाल काय येते, याकडे लक्ष लागले आहे. जानाळा येथे झालेल्या लग्न समारंभात ५० च्या वर लोक एकत्रित आले होते. या सोहळ्यातूनही कोरोनाचा बराच संसर्ग झाला आहे.

शासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार ५० टक्के क्षमतेनेच प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे. असे असताना, एवढे मजूर दोन ट्रॅव्हल्समध्ये आले कसे,श असा प्रश्न निर्माण झाला आहे. या ६५ मजूरांपैकी अनेक मजुरांकडे ई-पासदेखील नसल्याची माहिती आहे. दोन ट्रॅव्हल्समध्ये एवढे ई-पासधारक मजूर आणणेही शक्य नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून ३० मजुरांना ओम साई मील येथे आणण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र प्रत्यक्षात ६५ मजुरांना आणण्यात आले. या सर्व मजुरांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे बंधनकारक होते. मात्र, स्थानिक राईस मील मालकाने मजुरांना सुविधा नसताना गृह अलगीकरणात ठेवले.

बिहार राज्यातून आलेल्या ६५ मजुरांपैकी ३२ मजुरांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले असून उर्वरित ३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यासंदर्भात येथील तलाठी यांच्या अहवालावरून पोलीस स्टेशन मूल येथे तक्रार देण्यात आली आहे.- यशवंत पवार,प्रभारी तहसीलदार, मूल

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस