शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; ४०१ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 21:12 IST

शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला. एकाच दिवशी नव्या ४०१ रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यावासीयांची चिंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला. एकाच दिवशी नव्या ४०१ रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यावासीयांची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता एकूण बाधित रुग्णसंख्या ५२५३ झाली आहे. आतापर्यंत दोन हजार ८९७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसगार्चा वेग आता आणखी वाढला आहे. समूह संक्रमणाच्या विळख्यात जिल्हा असल्याचे दिसून येत आहे. दीडशे, दोनशे, अडीचशे याप्रमाणे रुग्ण वाढृू लागल्यानंतर आता शुक्रवारी चक्क ४०१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांमध्ये पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये बालाजी वॉर्ड चंद्रपूर येथील ४८ वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ४ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच न्युमोनियाचा आजार असल्याने ११ सप्टेंबरला पहाटे त्याचा मृत्यू झाला.

दुसरा मृत्यु सिस्टर कॉलनी चंद्रपूर येथील ४२ वर्षीय महिला बाधितेचा आहे. ९ सप्टेंबरला बाधितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. ११ सप्टेंबरला पहाटे बाधितेचा मृत्यू झाला आहे. या बाधितेला कोरोनासह न्युमोनिया होता. तिसरा मृत्यु माजरी, भद्रावती येथील ५५ वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता.

चवथा मृत्यू बल्लारपूर येथील ५६ वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधितालाही कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता तर पाचवा मृत्यु ब्रह्मपुरी येथील ७८ वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला ९ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १० सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ६१ बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ५७, तेलंगणा एक, बुलडाणा एक व गडचिरोली जिल्ह्यातील दोन बाधितांचा समावेश आहे.जिल्ह्यात २४ तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील २२०, कोरपना तालुक्यातील १२, गोंडपिपरी तालुक्यातील तीन, चिमूर तालुक्यातील १९, नागभीड तालुक्यातील एक, पोंभूर्णा तालुक्यातील चार, बल्लारपूर तालुक्यातील २३, ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२, भद्रावती तालुक्यातील १६, मूल तालुक्यातील २७, राजुरा तालुक्यातील २०, वरोरा तालुक्यातील १०, सावली तालुक्यातील दोन, सिंदेवाही तालुक्यातील आठ, गडचिरोली येथून आलेले दोन तर उमरेड-नागपूर येथून आलेले दोन असे एकूण ४०१ बाधित पुढे आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस