शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; चंद्रपुरातच होत आहे कोरोनाची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 14:37 IST

२ जूनपासून चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच कोरोनाची अद्यावत तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे.

ठळक मुद्देअद्ययावत प्रयोगशाळा कार्यान्वित आतापर्यंत सहाशेहून अधिक चाचण्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर विदर्भासाठी केवळ नागपूर येथेच रुग्णाच्या स्वॅब अहवालाची तपासणी केली जायची. त्यामुळे रुग्णाचा स्वॅब अहवाल यायला विलंब लागायचा. मात्र आता २ जूनपासून चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच कोरोनाची अद्यावत तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. दररोज दीडशे चाचणीची क्षमता असलेल्या या प्रयोगशाळेत आतापर्यंत सहाशेहून अधिक रुग्णांचा स्वॅब अहवाल तपासण्यात आला आहे. त्यातील चार रुग्ण पॉझिटिव्हही निघाले आहेत.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर यासाठी दोन कोटी १८ लाखांचा निधीही दिला. यातून अल्पावधीतच ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. २ जूनपासून या प्रयोगशाळेत रुग्णांचे स्वॅब अहवाल तपासले जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांच्या मार्गदर्शानात व सुक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमख डॉ. राजेंद्र सूरपाम यांच्या नेतृत्वात प्रयोगशाळेचे कामकाज सुरू आहे. यासाठी डॉ. सूरपाम यांच्यासोबत २० जणांची चमूदेखील येथे कार्यरत आहे.दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात आढळलेल्या चार पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वॅब अहवाल याच प्रयोगशाळेत तपासण्यात आले होते.

कोरोनानंतरही होणार प्रयोगशाळेचा उपयोगदेशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. संशयित रुग्णांच्या लवकरात लवकर तपासण्या व्हाव्या, यासाठी युध्दपातळीवर काम करीत ही प्रयोगशाळा उभारण्यात आली. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतरही या प्रयोगशाळा कार्यरत असणार आहे. यात चंडीपुरा (मेंदूज्वर), स्वाईन फ्ल्यू, चिकुन गुनिया यासारख्या आजाराची चाचणी केली जाणार आहे.२४ तास सेवेतचंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना तपासणी प्रयोगशाळा २४ तास सेवेत आहे. रात्रंदिवस येथे रुग्णाचा स्वॅब अहवाल तपासला जात आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांचेच अहवाल येथे तपासले जात आहे. मात्र पुढे प्रयोगशाळेचा विस्तार केल्यानंतर गडचिरोली व जवळच्या जिल्ह्यातीलही रुग्णांचा अहवाल तपासला जाणार आहे.२ जून २०२० पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे. दररोज १५० स्वॅब अहवाल तपासण्याची क्षमता या प्रयोगशाळेची आहे. येथेच अहवाल तपासला जात असल्याने आता रुग्ण आणि आरोग्य विभागासाठीही सोयीचे झाले आहे.-डॉ. एस.एस. मोरे,अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस