शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:30 IST

विनापरवानगी वाळूची वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करताना अडथळा करणाऱ्या वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : विनापरवानगी वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना अडथळा करणाऱ्या वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झालेल्या आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे.तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी वाळूतस्करांविरुद्ध धडक मोहीम सुरु केली आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता नाका क्रमांक तीन येथे एमएच ३४ ए ४२०९ क्रमांकाचे वाहन अडविले. त्यानंतर अवैध वाहतुकप्रकरणी ट्रॅक्टरमालक देविदास धोंडूजी कोटरंगे यांच्यावर कारवाई सुरु केली. यावेळी ट्रॅक्टर चालक- मालक असोसिएशनचे अध्यक्ष व नगरसेवक राजू डोहे, शरीफ सिद्दीकी, मोहम्मद जावेद शेख यांनी कारवाईत अडथळा निर्माण केल्याची तक्रार तहसीलदारांनी राजुरा पोलीस ठाण्यात दाखल केली.या तक्रारीवरुन पोलिसांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.जुन्या टीपीवर रेतीची वाहतूकचंद्रपूर : रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या १९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यातील अनेक वाहनचालकांकडे टीपी नव्हती. काहींकडे जुनी टीपी आढळून आली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. चंद्रपूर उपविभागीय क्षेत्रात रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यासह विशेष मोहीम राबविली. मागील चार ते पाच दिवसांत सुमारे १९ वाहने जप्त करण्यात आली. जुनोना, बंगाली कॅम्प चौक, जनता कॉलेज चौक, घुग्घुस येथे या कारवाया करण्यात आल्या. ट्रक, हापटन, ट्रॅक्टर या वाहनांना जप्त करुन त्यांच्यावर दंड आकारण्यात आल्याची माहिती आहे.