राजुरा : उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे शनिवारी सकाळी ९ वाजता राजुराचे आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या उपस्थितीत आरोग्यसेवकांना कोरोना लस देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी आ. सुभाष धोटे म्हणाले, कोरोना लसीकरण सुरू झाल्याने देशातील नागरिक आनंदी आहेत. आम्हीही या उपक्रमाचे आनंदाने स्वागत करतो. शनिवारी राजुरा येथे १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.लहू कुडमेथे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, आदिवासी नेते श्यामराव कोटनाके, जंगु येडमे, राजुरा युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य अशोक राव, डॉ. अशोक जाधव, डाॅ.ए.डी. आरके, डाॅ.विलास डाखोळे डॉ.शारदा येरमे, परिचारिका डॉ.एस. आर. राॅय, सोनाली शेंडे, विद्या परचाके, प्रियंका रघाताटे, पल्लवी पिपरीकर, डॉ.वि. एन. लांजेकर, डॉ.पी. आर. कामडी, डॉ.एस. एम. गाडगे यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.