शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी व कंत्राटाच्या मुदतवाढीवरून वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:00 IST

इरई धरणात पाणी असतानाही शहरात अनियमित केलेला पाणी पुरवठा व नाले सफाईच्या कंत्राटदाराला सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत चांगलीच खडाजंगी झाली. बाचाबाची एवढी वाढली की एक वेळ ही आमसभा आहे की युध्दाचे रणांगण हेच कळेनासे झाले होते.

ठळक मुद्देमनपाची आमसभा वादळी : नागरकर व देशमुख यांच्यात धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इरई धरणात पाणी असतानाही शहरात अनियमित केलेला पाणी पुरवठा व नाले सफाईच्या कंत्राटदाराला सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत चांगलीच खडाजंगी झाली. बाचाबाची एवढी वाढली की एक वेळ ही आमसभा आहे की युध्दाचे रणांगण हेच कळेनासे झाले होते. दरम्यान, काँग्रेसचे नंदू नागरकर आणि सभागृहनेते वसंत देशमुख यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. यात आणखी काही नगरसेवक गुंतल्याने रणक्रंदन माजले. विविध मुद्यांवरून उठलेले वादंग शांत होत नसल्याने अखेर काँग्रेसच्या व इतर नगरसेवकांनी सभात्याग करून आपला निषेध नोंदविला.पावसाळा संपायला आला तरी उन्हाळ्यापासून कपात केलेला पाणी पुरवठा पूर्ववत नियमित केला नाही. जाणीवपूर्वक चंद्रपूरकरांना पाण्यासाठी वंचित ठेवले जात आहे. मनपाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी मडके घेऊनच सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे आमसभा सुरू होताच वादळ उठले. पावसाळा सुरू झाल्यानंतर तो संपेपर्यंत पाणी पुरवठा नियमित का केला नाही, असे विचारत नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेविका सुनिता लोढिया व इतर नगरसेवकांनी सभागृहातच मडके फोडले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी पक्षातील व विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये खडाजंगी सुरू झाली.नाले सफाईच्या कंत्राटाची मुदत संपली आहे. त्यानंतर परत निविदा काढण्याऐवजी मनपाच्या स्थायी समितीत सदर कंत्राटाला सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. याबाबत नगरसेवक नंदू नागरकर यांनी महापौर व स्थायी समिती सभापती यांना जाब विचारला. स्थायी समितीची सभा दर आठवड्यात होते. त्यामुळे आठवड्याची किंवा एक महिन्याची मुदतवाढ द्यायला हवी होती. मात्र सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ कोणत्या निकषावर देण्यात आली, असे नागरकर यांनी म्हटले. त्यानंतर सभागृह नेता वसंत देशमुख आणि नंदू नागरकर यांच्यामध्ये खडाजंगी सुरू झाली. दोघेही एकमेकांवर धाऊन गेले. दरम्यान नगरसेवक संदीप आवारी, सुरेश पचारे, दीपक जयस्वाल व काही नगरसेवकांनी मधे येऊन दोघांनाही सावरले. तरीही यात चांगलीच धक्काबुक्की झाली. दरम्यान, यावेळी नगरसेवक नंदू नागरकर, सुनिता लोढिया, दीपक जयस्वाल, अशोक नागापुरे, प्रहारचे पप्पु देशमुख यांनी सभागृह नेता वसंत देशमुख हे मद्य प्राशन करून असल्याचा आरोप करीत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली. हा गोंधळ जवळपास १५-२० मिनिटे सुरूच होता. त्यामुळे महापौर अंजली घोटेकर यांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली व त्या सभागृहाबाहेर निघून गेल्या. काही वेळानंतर सभा पूर्ववत सुरू झाली. त्यानंतर इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जेल मार्गाचे शहीद बाबुराव शेडमाके मार्ग असे नामकरण करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे महापौर यांनी सांगितले.‘पाणी द्या महापौर’ आंदोलनआमसभा सुरू असतानाच महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मडके घेऊन ‘पाणी द्या महापौर’ आंदोलन करण्यात आले. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात मुबलक जलसाठा आहे. धरणाचे दोन दरवाजे काही दिवसांपूर्वी उघडावे लागले. तरीही चंद्रपूरकरांना दररोज पाणी दिले जात नाही. हा चंद्रपूरकरांवर अन्याय आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी बँड पथकही आणण्यात आले होते. यावेळी कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, सुनिता लोढिया, अमजद खान व काँग्रेस नगरससेवक उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या धोरणाचा निषेध करण्यात आला व निदर्शने देण्यात आली.गांधी जयंतीपासून पाणीसभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच महापौर अंजली घोटेकर यांनी २ आॅक्टोबर गांधी जयंतीपासून चंद्रपुरात दररोज पाणी पुरवठा केला जाईल, अशी माहिती दिली. या संदर्भात पाणी पुरवठा करणाºया उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.