मूल :
तालुक्यात ३७ ग्राम पंचायतीच्या निवडणुका होत असल्या तरी ४३ सदस्य व राजगड व उथडपेठ या दोन ग्राम पंचायती अविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत २७४ सदस्यांसाठी ७४३ उमेदवार रिंगणात आहेत.
३५ गावात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात न आल्याने संभ्रम आहे. शासन विविध कामासाठी थेट ग्रामपंचयतीला निधी देत असल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. यात प्रमुख्याने भाजपा, काँग्रेस या पक्षात चुरस असली तरी राकाँ, बसपा, शिवसेना, व अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
सध्या ३७ ग्रामपंचायतीपैकी जवळपास १७ ग्रामपंचयतीमध्ये भाजपा तर १७ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता तर तीन ग्रामपंचायतीवर बसपा व मित्रपक्षाची सत्ता होती. ती कायम राहावी यासाठी जो-तो प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. राजगड व उथडपेठ ही दोन गावे अविरोध आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी केलेला प्रयत्नाला यश आले आहे. या निवडणुकीत २६ हजार ८९८ महिला तर २८ हजार ८ पुरुष मतदानाचा हक्क बजाणार आहेत. जवळपास ५५ हजार मतदाराच्या हातात भविष्यातील सदस्याचे भवितव्य अवलंबून आहे.
बाॅक्स
या गावांमध्ये निवडणूक
राजोली, डोंगरगाव, मोरवाही, टेकाडी, विरई, नलेश्वर, जानाळा, केळझर, बोंडाळाबुज, येरगाव, चिखली, भादुर्णी, चमढा, फिस्कूटी, चिरोली, नांदगाव, गोवेर्धन, पिपरी दीक्षित, मुरमाडी, मारोडा, काटवन, चितेगाव, बोरचादली, चांदापूर, जुनासुर्ला, चिचाळा, हळदी, सुशी दाबगाव, दाबगाव मक्ता, नवेगाव भूजला, गांगलवाडी, कोसंबी, मरेगाव, भवराळा, खालवसपे, आदी गावांचा समावेश आहे.