शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

प्रियदर्शिनी चौकात कार्यकर्ते व पोलिसांत वादावादी

By admin | Updated: October 16, 2014 23:22 IST

धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमस्थळाकडे निघालेल्या रॅलीतील कार्यकर्ते व वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्यात रॅली पुढे नेण्यावरून चांगलीच वादावादी झाली. त्यामुळे काही काळ या परिसरात

चंद्रपूर: धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमस्थळाकडे निघालेल्या रॅलीतील कार्यकर्ते व वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्यात रॅली पुढे नेण्यावरून चांगलीच वादावादी झाली. त्यामुळे काही काळ या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. प्रकरण रामनगर पोलीस ठाण्यात पोहचले. तत्पूर्वी सावरकर चौकात पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्ती करून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यकर्ते तेथून निघून गेले. अनुचित घटना घडू नये, म्हणून शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास स्थानिक प्रियदर्शिनी चौकात घडली.या तणावामुळे प्रियदर्शिनी चौकात तीनही बाजुने जवळपास एक तास वाहतूक खोळंबली होती. स्थानिक आंबेडकर महाविद्यालय परिसरात धम्मचक्र अनुप्रर्वतन दिन समारंभानिमित्त गुरूवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रियदर्शिनी चौकातून दोन वेगवेगळ्या रॅली जात होत्या. यातील पुढे असलेली रॅली काही क्षण तेथे थांबली. याचवेळी वाहतूक पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे तेथे पोहचले. तेथे रॅली पुढे नेण्याच्या कारणावरून सपकाळे व रॅलीतील कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वांदग झाले. सपकाळे यांनी डॉ. बाबासाहेबांचा अपमान केला, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. रॅलीतील शेकडो कार्यकर्ते रामनगर पोलीस ठाण्याकडे निघाले. पुंडलिक सपकाळे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी सावरकर चौकात वाहतूक अडवून धरली. याचवेळी पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी येथे सौम्य लाठीमारही केला. वरिष्ठ पोलीस अधिकारीही तेथे पोहचले. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यकर्ते तेथून निघून गेले. याचवेळी या मार्गावर एका इंडिका चालकाने दुसऱ्या एका वाहनाला धडक दिल्याने काहींनी इंडिकाच्या चालकाला वाहनाबाहेर ओढून मारहाण केली. सध्या तणावपूर्ण शांतता असून अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढविला आहे. (प्रतिनिधी)