लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : आपला सभोवताल अनेक समस्या असताना, साहित्यिकांवर खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. अशा समस्या बघून कवी हा कदापीही स्वस्थ बसू शकत नाही. त्यामुळे समकालीन वास्तव कवींच्या लेखनाचा विषय झाला पाहिजे, असे प्रतिपादन स्मृतीगंध काव्य संमेलनात डॉ. पद्मरेखा धनकर यांनी केले.स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठाण भद्रावतीच्या वतीने रविवारी दुसरे स्मृतीगंध काव्य संमेलन पार पडले. यावेळी त्या संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक बी. डी. मडावी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कांदबरीकार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रविंद्र शोभणे नागपूर, डॉ. विजय सोरते, बल्लारपूर, ज्येष्ठ कवी बापूराव टोंगे आदी उपस्थित होते. यावेळी धनकर पुढे म्हणाल्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण व अस्पृश्यता अशा तत्कालीन जळणाऱ्या ज्वलंत प्रश्नांवर लेखनीतून मोठी क्रांती घडवली. त्या लेखनातून नवोदितांनी आणि पुरुष लेखकांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. याप्रसंगी नवोदित कवयित्री मंजुषा दरवरे यांच्या ‘घातक’ या कविता संग्रहाचा प्रकाशन करण्यात आले.संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवी कवी संमेलन पार पडले. यावेळी विदर्भातील प्रतिभाशाली कवींनी विविध विषयांवर कविता सादर केली. यावेळी मंचावर ज्येष्ठ कवी प्र. ग. तल्लारवार, बापुराव टोंगे, डॉ. विजय सोरते उपस्थित होते. संमेलनाचे संचालन पुनीत मातकर यांनी केले.संमेलनाच्या तिसºया सत्रामध्ये ज्येष्ठ साहित्यीक आचार्य ना. गो. तुटे अध्यक्षतेखाली खुले कवी संमेलन पार पडले. यावेळी डॉ. सुरेश परसावार, डॉ. सुधीर मोते, प्रा. विवेक सरपटवार भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर उपस्थित होते. संचालन विवेक सरपटवार तर आभार प्रवीण आडेकर यांनी मानले.
समकालीन वास्तव कवितेचा विषय व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:09 IST
आपला सभोवताल अनेक समस्या असताना, साहित्यिकांवर खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. अशा समस्या बघून कवी हा कदापीही स्वस्थ बसू शकत नाही. त्यामुळे समकालीन वास्तव कवींच्या लेखनाचा विषय झाला पाहिजे, असे प्रतिपादन स्मृतीगंध काव्य संमेलनात डॉ. पद्मरेखा धनकर यांनी केले.
समकालीन वास्तव कवितेचा विषय व्हावा
ठळक मुद्देपद्मरेखा धनकर : भद्रावती येथे स्मृती गंध काव्यसंमेलन