शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम जनजीवन जागृती अभियानातून कर्तव्याची जाणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:30 IST

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. तर ग्रामीण भागात शिक्षणाच्या योग्य सुविधा नसल्याने ग्रामीण भाग माघारला आहे.

ठळक मुद्देगजानन बुटके यांचा उपक्रम : २१ ग्रामपंचायतीमध्ये अभियान पोहचणार

आॅनलाईन लोकमतचिमूर : स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. तर ग्रामीण भागात शिक्षणाच्या योग्य सुविधा नसल्याने ग्रामीण भाग माघारला आहे. नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य माहित नाही़ त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक योजनांपासून वंचित आहेत. अशा वंचितांना अधिकार व कर्तव्याची जाणिव करून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन बुटके यांच्या कल्पनेतून ग्राम जन-जीवन जागृती अभियान राबविण्यात येत आहे़शासनाद्वारे ग्रामीण भागात अनेक योजना राबविण्यात येतात़ मात्र त्या योजना लाभार्र्थांपर्यत पोहोचत नाहीत़ योजनांची योग्य माहिती लाभार्थ्यांंस नसल्याने विकासापासून दूर राहावे लागते़ कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अनेक योजना रखडेल्या आहेत़ या योजना नागरिकांपर्यत पोहचविणे आणि गावाच्या विकासात भर टाकण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.ग्राम जन - जीवन जागृती अभियान मासळ आणि मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील २१ ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे़ या अभियानाची सुरुवात ८ जानेवारीला पिपर्डा ग्रामपंचायतींपासुन करण्यात आली़ हे अभियान सायंकाळी ५ वाजता स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात येणार आहे त्यामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे़ दुसऱ्या दिवशी ग्रामस्वच्छता अभियान राबून गावकऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली जाते़ अभियानाची सांगता २२ जानेवारीला होणार आहे़ या उपक्रमामुळे नागरिकांना लोकशाहीचे धडे मिळणार आहे.यांचा राहणार सहभागअभियानात जि.प सदश्य गजानन बुटके , सरपंच, उपसरंपच, ग्रा़ पं़ सदस्य, पचायंत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, परिचारिका, तलाठी, कृषी सहाय्यक, विद्युत सेवक, वनरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा समावेश राहणार आहे़या विषयांवर होणार मार्गदर्शनआपले कर्तव्य, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, कोरडा आठवडा , स्वछ ग्राम अभियान, जल सवंर्धन, आहार, शिक्षण, कुपोषण, माता, बाल संगोपन, महिला सबलीकरण लसीकरण, कुंटुब नियोजन, मातामृत्यु, बाल मृत्यु, साथीचे रोग, पशुसंवर्धन तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे़ या अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते़