शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

निधीअभावी रखडले बंधाऱ्याचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:38 IST

राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगतच्या नाल्यावर तब्बल दहा-बारा वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला. मात्र, या बंधाऱ्याचे बांधकाम उशिरा सुरू झाल्यामुळे बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला.

ठळक मुद्देबजेट वाढल्याने कंत्राटदार पसार : शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न भंगले

प्रकाश काळे।आॅनलाईन लोकमतगोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगतच्या नाल्यावर तब्बल दहा-बारा वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला. मात्र, या बंधाऱ्याचे बांधकाम उशिरा सुरू झाल्यामुळे बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला. त्यामुळे संबधित कंत्राटदाराने काम सोडून दिले. या बंधारा बांधकामाला वाढीव निधी द्यावा, अशी मागणी अनेकदा शेतकरी व गोवरीवासीयांनी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे केली. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने गोवरीचा बंधारा आता अखेरच्या घटका मोजत आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी हे वेकोलिच्या कुशीत वसलेले चार हजार लोकसंख्येचे गाव. गावाच्या सभोवताल वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. वेकोलित पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने परिसरातील पाण्याची पातळी पूर्णत: खोल गेलेली आहे. बंधाºयामुळे पाण्याची पातळी वाढेल आणि गावकºयांना व परिसरातील शेतकºयांना सिंचनाचा लाभ घेता येईल, या हेतूने दहा-बारा वर्षांपूर्वी गोवरी गावालगतच्या नाल्यावर बंधारा बांधकाम सुरू केले.परंतु बंधाºयाचे काम उशिरा सुरू झाल्याने बंधारा बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला. संबंधित कंत्राटदाराला काम करणे परवडत नसल्याने त्याने अर्ध्यावरच काम सोडून दिले. वाढीव निधीअभावी बंधाºयाचे काम अडल्याने शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीचे स्वप्न भंगले आहे. बंधाऱ्याला वाढीव निधी मिळावा, यासाठी बंधारा समितीचे अध्यक्ष नागोबा पाटील लांडे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्याकडे पाठपुरावा केला. बंधाऱ्याचे काम गेल्या दहा-बारा वर्षांपासून अपूर्ण असल्याने शासनाने बंधारा बांधकामावर लाखो रुपये खर्चूनही या बंधाऱ्याचा उपयोग कुणालाही झाला नाही.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ असा शासनाचा नियम आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी शासन जनजागृती करते. मात्र शासनाच्या नियोजनशून्य धोरणामुळे लाखो रुपये खर्च करूनही बंधाऱ्यात पाण्याचा एक थेंबही अडविता आला नाही, हे दुदैव आहे.त्यामुळे या बंधाºयाचे तातडीने बांधकाम करावे, अशी मागणी गोवरी येथील गणपत लांडे, भाऊराव रणदिवे, शंकर लांडे, मारोती लांडे, भास्कर लोहे, अमित रणदिवे, सुमित रणदिवे, प्रमोद लांडे, श्रीधर जुनघरी, भास्कर जुनघरी, प्रभाकर जुनघरी, निखील लांडे यांनी केली आहे.तीन आमदार बदलले, बंधारा अपूर्णचबंधारा बांधकाम सुरू झाल्यापासून राजुरा विधानसभा क्षेत्राचे तब्बल तीन आमदार बदलले. मात्र हा बंधारा तसाच खितपत अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन बंधारा बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी गोवरीवासीयांनी केली आहे.शासनाने दहा-बारा वर्षांपूर्वी गोवरी गावालगतच्या नाल्यावर लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधला. मात्र नियोजनाअभावी बंधारा बांधकाम रखडले. बंधाºयाचे काम पूर्ण करावे, यासाठी संबधितांकडे चकरा मारल्या. पण बंधारा अजूनही पूर्ण झाला नाही.- नागोबा पाटील लांडे,अध्यक्ष, बंधारा समिती, गोवरी