शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

सतत स्क्रीनकडे बघताय, डोळे होताहेत आळशी; वेळीच व्हा सावध, घ्या 'ही' काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 15:55 IST

डोळ्यांच्या तक्रारीमुळे दैनंदिन जीवनावर त्याचा विपरित परिणाम होतो. सतत समोर असणारा मोबाईल, संगणक, लॅपटाॅप आणि टीव्हीमुळे डोळ्यांना ताण येतो. यामुळे वेळीच सावध होऊन डोळ्यांना ताण येणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

चंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये संगणक, मोबाईल, लॅपटाॅप, टीव्हीचा वापर अधिक वाढला. सतत स्क्रिनकडे पाहण्याचे दुष्परिणाम आता दिसून येत आहेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांना डोळ्यांच्या विविध प्रकारच्या तक्रारी उद्भवत असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डोळ्यांच्या तक्रारीमुळे दैनंदिन जीवनावर त्याचा विपरित परिणाम होतो. सतत समोर असणारा मोबाईल, संगणक, लॅपटाॅप आणि टीव्हीमुळे डोळ्यांना ताण येतो. यामुळे वेळीच सावध होऊन डोळ्यांना ताण येणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात याचे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे.

काय काळजी घ्यावी

  • संगणक, मोबाईल, टीव्हीकडे एकटक पाहू नये, कमी वापर करावा. 
  • आहारात फॅटी ॲसिडचा समावेश वाढवा. 
  • ठराविक वेळाने डोळे स्क्रिनपासून बाजूला न्या. २० ते ३० सेकंदासाठी डोळ्यांची उघडझाप करा.
  • डोळ्यातील ओलेपणा टिकून ठेवण्यासाठी दर ठराविक वेळाने डोळे पाण्याने धुवा.
  • उन्हात बाहेर जाणार असाल तेव्हा आवर्जून सनग्लासचा वापर करा.

संगणकावर काम करताना काही वेळाने दूरवर बघण्याचा प्रयत्न करा.

डोळ्यांवर ताण का येतो ?

  • संगणक, मोबाईल, टीव्हीकडे सतत पाहत राहणे.
  • कमी प्रकाशात काम करणे.
  • एकटक पाहून करावी लागणारी कामे यामुळे डोळ्यांच्या अडचणी उद्भवतात.
  • दीर्घकाळ एसीमध्ये बसून काम केल्याने डोळ्यातील ओलावा कमी होतो.

वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी, हार्मोनचे बिघडलेले संतुलन, डोळ्यावर ताण येण्यास कारणीभूत ठरते.

डोळ्यांची उघडझाप न करता सतत स्क्रिनकडे पाहत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण सतत स्क्रिनकडे पाहत राहिल्याने डोळे आळशी होण्याचा धोका होताे. डोळे चुरचुरणे, लाल होणे, कोरडे पडणे, डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे दिसताच त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

ही लक्षणे दिसली तर घ्या डाॅक्टरांचा सल्ला

  • डोळे चुरचुरणे
  • लाल होणे
  • कोरडे पडणे

डोळ्यातून पाणी येणे.

सतत स्क्रिनकडे बघितल्याने डोळ्यांचा आजार होण्याची शक्यता असते. अशावेळी ठराविक वेळानंतर डोळ्यांना स्क्रिनपासून दूर ठेवा. थोड्या-थोड्यावेळाने उघडझाप करा. डोळ्यातून पाणी येत असेल, कोरडे पडले असेल, चुरचुरत असेल तर त्वरित डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

-डाॅ.सदानंद मोहीतकर, नेत्ररोगतज्ज्ञ, चंद्रपूर

टॅग्स :Healthआरोग्यeye care tipsडोळ्यांची निगा