शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ओटीपोटात सतत दुखतंय, गर्भाशयात गाठ तर नाही ना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

साधारणत: ३० ते ४५ वयोगटातील काही महिलांना ओटीपोटीमध्ये दुखते. प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या महिलांमध्ये आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात. काही महिलांच्या गर्भाशयात गाठी होण्याची शक्यताही अधिक असते. कंबरदुखी, गर्भधारणेत अडचणी, अनियमित पाळी, गर्भपात हीदेखील गर्भाशयात गाठी असण्याची लक्षणे आहेत. नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास निदान केले जाऊ शकते. यामध्ये दोन प्रकारचे उपचार करता येतात.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बदलत्या जीवनशैलीमध्ये विविध आजारांचेही प्रमाण वाढल्याचे दिसून येते. यांतील एक आजार महिलांमध्ये ओटीपोटात सतत दुखल्याच्या तक्रारींचा आहे.  बहुतेक वेळा गर्भाशयात गाठ असली तर त्याची बाह्यलक्षणे फारशी दिसत नाहीत. परिणामी काही महिला दुखणे अंगावर काढतात. मात्र जास्तच विलंब झाला तर गर्भशयातील गाठीचा आकार वाढून शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येक महिलांनी सतर्क राहून आपल्या आरोग्याची वेळीच काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.साधारणत: ३० ते ४५ वयोगटातील काही महिलांना ओटीपोटीमध्ये दुखते. प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या महिलांमध्ये आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात. काही महिलांच्या गर्भाशयात गाठी होण्याची शक्यताही अधिक असते. कंबरदुखी, गर्भधारणेत अडचणी, अनियमित पाळी, गर्भपात हीदेखील गर्भाशयात गाठी असण्याची लक्षणे आहेत. नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास निदान केले जाऊ शकते. यामध्ये दोन प्रकारचे उपचार करता येतात. यात कमी स्वरूपाचा आजार असेल तर औषधांनी गाठ नष्ट करता येते आणि शस्त्रक्रिया करून गाठ काढता येते. त्यामुळे डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

 साधारणत: लक्षणे काय? गर्भाशयातील गाठीमुळे अंगावर भरपूर जाणे, ओटीपोटात सतत दुखणे आणि अनियमित पाळी, अशी लक्षणे आढळतात. गाठ मोठी असेल तर मूत्राशयावर दबाव येऊन वारंवार लघुशंकेला जावे लागते. सततची कंबरदुखी, वारंवार गर्भपात, गर्भधारणा होण्यास अडचण येते.

...तर कर्करोगाची शक्यतागर्भाशयातील गाठींना फायब्राॅइड म्हणतात. वेळीच उपचार घेतले तर ठीक होते. मात्र, दुर्लक्ष करू नये. क्वचितप्रसंगी अशा गाठीचे रूपांतर कर्करोगात होते. गाठीमुळे होणारा त्रास हे गाठीच्या आकारावार व गर्भाशयातील स्थान कोणते यावर अवलंबून असते. अतिरक्तस्राव, पोट, कंबर दुखणे, वारंवार गर्भपात, गर्भधारणा न होणे या अडचणी येतात.

या वयातील महिलांना सर्वाधिक धोका- ३० ते ४५ या वयोगटातील  महिलांना या संदर्भातील सर्वाधिक धोका होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. - ओटीपोटीतील त्रास नेमका किती गंभीर आहे, गर्भाशयात गाठ झाली का, हे लवकर लक्षात येत नाही. - बऱ्याच वेळा गर्भाशयात गाठी असल्या तरी त्यांचे लक्षण दिसत नाही. वैद्यकीय तपासणी केल्यास गर्भाशयात गाठ आहे, हे लक्षात येईल आणि लवकरात लवकर औषधोपचार सुरू करता    येते.

 वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणतात?

ओटीपोटीमध्ये सतत दुखणे, अनियमित पाळी असे काही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. आवश्यकता असल्यास सोनाग्राफी करून निदान करता येते. मात्र, कुणीही अंगावर दुखणे काढू नये. तपासणीमध्ये गर्भाशयात गाठ आहे, हे लक्षात आल्यानंतर औषधोपचाराने किंवा शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढता येते. वेळोवेळी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.-डाॅ. भारती सदानंद मोहितकर, स्त्रीरोगतज्ज्ञ, चंद्रपूर

 

टॅग्स :Healthआरोग्य