शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राजुºयात काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:13 IST

सरकारच्या अकार्यक्षम धोरणाविरोधात काँग्रेसच्या वतीने माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात आज शनिवारी राजुºयात मोर्चा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

ठळक मुद्देसुभाष धोटे : अकार्यक्षम सरकारमुळे सामान्य जनतेचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : सरकारच्या अकार्यक्षम धोरणाविरोधात काँग्रेसच्या वतीने माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात आज शनिवारी राजुºयात मोर्चा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.मोर्चाला संबोधित करताना माजी आमदार सुभाष धोटे म्हणाले, खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या तीन वर्षांत जवळपास दुपटीने दरवाढ झाली आहे. सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. नोटाबंदी, जीएसटी यामुळे जीडीपी खालावून आर्थिक मंदी आणि महागाईचे चटके सर्वांना सोसावे लागत आहे. कागदी विकास उभा केला जातोय. पण राज्यात आज लोडशेडिंगचे सौभाग्य लाभले आहे आणि सरकारी आशिवार्दाने शेतकºयांवर विष फवारणी होत आहे. प्रकल्पग्रस्तांची होरपळ होतेय, सर्व सामान्यांची फसवणूक होत आहे.शनिवारी सकाळी १० वाजता राजुरा येथील प्रसिद्ध भवानी मंदिर ते तहसील कार्यालयपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. विशेष म्हणजे, यावेळी सरकारची प्रतिकात्मक शवयात्रा काढण्यात आली.राजुराचे तहसीलदार रवींद्र होळी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या तातडीने सोडविण्यासाठी एक निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषद विरोधी पक्षाचे गटनेते डॉ. सतीश वारजूरकर, चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर, विनायक बांगडे, विनोद दत्तात्रय, सुभाष गौर, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस डॉ. आसावरी देवतळे, चंद्रपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया, चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनंदा जीवतोडे, दिनेश चोखारे, संतोष लहामगे, काँग्रेसचे चंद्रपूर विधानसभा प्रमुख महेश मेंढे, काँग्रेसचे राजुरा तालुका अध्यक्ष दादापाटील लांडे, कोरपना तालुका अध्यक्ष विठ्ठल थिपे, जिवती तालुका अध्यक्ष गणपत आडे, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, काँग्रेसचे राजुरा विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यातील बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीच्या सभापती व सर्व सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, यासह काँग्रेसच्या सर्व विभागाचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.