शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कॉग्रेस शहराध्यक्षांनी स्वत:लाच काळे फासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:46 IST

येथील सहायक दुय्यम निबंधक अधिकारी उईके यांच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी उईके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला ....

ठळक मुद्देमाहिती देण्यास टाळाटाळ : प्रशासन व सहायक दुय्यम निबंधकांचा असाही निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील सहायक दुय्यम निबंधक अधिकारी उईके यांच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी उईके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला आणि स्वत:लाच काळे फासल्याच प्रकार गुरूवारी घडला.नंदू नागरकर यांनी १ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहराज्यमंत्री, मनपा आयुक्त यांना निवेदन देवून नगर काँग्रेस कमिटीची मालमत्ताप्रकरणी बल्लारपूर पेपर मिल मजदूर ट्रस्टचे अध्यक्ष माजी खा. नरेश पुगलिया, सचिव सी.के. नायर, संचालक मंडळ, माजी शहर काँग्रेस अध्यक्ष गजानन गावंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.या सर्वांनी संगनमत करून खोटे दस्तावेज, शपथपत्राच्या आधारे ९९ वर्षांची लीज घेत प्रशासनाची दिशाभूल केल्याच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासंदर्भात २९ आॅगस्टला नंदू नागरकर यांनी सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी उईके यांना स्मरण पत्र दिले होते. त्यांनी बल्लारपूर पेपर मिल मजदूर ट्रस्टवर गुन्हा दाखल करावे व लीज रद्द करावी, असे पत्रात म्हटले होते.अधिकाºयांनी या प्रकरणावर कार्यवाहीसाठी दस्ताऐवजांची माहिती मागितल्यानंतर भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे २४ जुलैचे आदेश पत्र, त्यासोबतच चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या १३ जुलैच्या ठरावाची प्रत तसेच ३ मे २०१४ रोजीच्या आपल्या नियुक्तीचे पत्र आपण सादर केले होते. तरीही कार्यवाही करण्याकडे अधिकाºयांनी दुर्लक्ष केले, असे नागरकर यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी उईके यांना निवेदन देण्याकरिता गेलो असता, ते उडवाउडवीचे उत्तर देत होते. त्यांनी कोणतेही दस्तावेज दाखवण्यास व त्याची माहिती देण्यास नकार दिला आणि काही ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे आपण स्वत:लाच काळे फासल्याचे नागरकर यांनी म्हटले आहे. यावेळी माजी प्रदेश सचिव सुनिता लोढिया, अनु. जाती विभागाचे संजय रत्नपारखी, अ‍ॅड. मलक शाकीर, असंघटीय कामगार विभाग शहर अध्यक्ष अनिल सुरपाम, मोहन डोंगरे उपस्थित होते.अन्यथा तीव्र आंदोलन करणारबल्लारपूर पेपर मिल मजदूर ट्र्स्टचे अध्यक्ष माजी खा. नरेश पुगलिया, सचिव सी.के. नायर, संचालक मंडळ, माजी शहर काँग्रेस अध्यक्ष गजानन गावंडे हे प्रशासनावर दबाव टाकत आहेत. त्यांचावर सोमवारपर्यंत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देत सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी उईके यांची त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.