चंद्रपूर : काँग्रेस पक्षाचे विचार प्रभावीपणे समाजमाध्यमांतून मांडणारे वरोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांची चंद्रपूर सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशाने, तसेच महाराष्ट्र प्रदेश कमिटी काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने करण्यात आली.
सोबतच वरोरा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून चेतना शेटे, चंद्रपूर विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून पवन नगरकर, राजुरा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून विक्रम येरणे, बल्लारपूर विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून परीश महाजनकर, ब्रह्मपुरी विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून सूरज बनसोड, तर चिमूर विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून श्रीकांत झिल्लारे यांची निवड करण्यात आली.