शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी काँग्रेस हाच एक पर्याय

By admin | Updated: January 9, 2016 01:23 IST

काँग्रेसने गोरगरीब जनतेला प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. पाड्यापासून ते महानगरपर्यंत देशात झालेला विकास हा विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या काँग्रेस पक्षाची देण आहे.

सुभाष धोटे : कोरपना येथे केली विकास कामेकोरपना : काँग्रेसने गोरगरीब जनतेला प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. पाड्यापासून ते महानगरपर्यंत देशात झालेला विकास हा विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या काँग्रेस पक्षाची देण आहे. त्यामुळे गाव व शहराच्या विकासासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले.कोरपना शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरपना नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा माजी विधान परिषद उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते श्रीधर गोडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, माजी अध्यक्ष शेखर धोटे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, जिल्हा बँकेचे संचालक विजय बावणे, काँग्रेसचे कोरपना तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे, राजुरा तालुकाध्यक्ष दादा पाटील लांडे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, माजी सभापती हिराताई रणदिवे, माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान, पंचायत समिती सदस्या हर्षाली गोडे, डॉ. अशोक राजुरकर, सिताराम कोडापे, शेख वहाबभाई, संभाजी कोवे, शाम रणदिवे, अभय मुनोत, पाशा पटेल, दिवाकर बोरडे, हारुण सिद्धीकी आदी मान्यवर उपस्भित होते.माजी आमदार सुभाष धोटे पुढे म्हणाले, भाजप आणि राष्ट्रवादीने आजपर्यंत लोकांना फक्त खोटी आश्वासने दिली. काँग्रेसने आश्वासने न देता कामे केली. आमदार असताना आपण २५ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी कोरपना शहराला देऊन या तालुका ठिकाण असलेल्या शहराचा विकास केला. कोरपन्यात झालेला विकास मतदार विसरणार नाही, असा विश्वास मतदारांवर दाखवून ‘खोटे बोला आणि रेटून बोला’ अशी निती असणाऱ्या विरोधकांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन केले. संचालन युवक काँग्रेस विधानसभा महासचिव सचिन फुलझेले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)भाजपने दिली केवळ पोकळ आश्वासने- पुरकेभाजपाने केवळ पोकळ आश्वासने दिली. मात्र पूर्तता कोणत्याही आश्वासनाची केली नाही, असा आरोप माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी अपल्या भाषणातून केला. ते म्हणाले, हे सरकार निव्वळ घोषणाबाज आहे. याचा अनुभव आता जनतेलाही आला आहे. म्हणूनच स्थानिक निवडणुकांत त्यांची सरशी जागोजागी दिसत आहे. नागरिकांनी योग्य विचार करावा, असे आवाहन त्यांनी सभेत केले.