शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

काँग्रेस आघाडीला पडला महाग

By admin | Updated: May 17, 2014 23:37 IST

गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्याचे तीन क्षेत्र यात येतात. या क्षेत्रामध्ये ओबीसी समाज जवळजवळ ४० ते ४६ टक्के आहे.

गडचिरोली-चिमूर क्षेत्रात : ओबीसी समाजाचा मोठा फटका

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्याचे तीन क्षेत्र यात येतात. या क्षेत्रामध्ये ओबीसी समाज जवळजवळ ४० ते ४६ टक्के आहे. या समाजाचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले. त्यामुळे हा समाज गेल्या अनेक वर्षांपासून नाराज आहे. ती नाराजी या समाजाने लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाला दाखवून दिली. याचा सर्वाधिक फटका गडचिरोली विधानसभा क्षेत्रात बसला. त्या खालोखाल आरमोरी व अहेरी विधानसभा क्षेत्रातही ओबीसी मतदारांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराकडे पाठ फिरविली. म्हणून भाजपचे मताधिक्य प्रचंड वाढले. दरवेळी काँग्रेससोबत राहणारा दलित व मुस्लीम समाज यावेळी अनेक ठिकाणी भाजपकडे गेला. अहेरी विधानसभा क्षेत्रात नाविसच्या प्रभावामुळे मुस्लीम समाजाने भाजपला जवळ केले. दलीत समाजाचेही अनेक मते भाजप सारख्या पक्षाला गेलेत. पक्षाऐवजी व्यक्तीला मतदान करण्यावर अनेकांनी भर दिला. एकूणच जातीयतेचा पगडा व परंपरागत मतदानाची व्होटबँक फुटल्यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले. २४ हजार मतदारांनी नोटाचा वापर केला. हा मतदार बहुतांश सुशिक्षीत मतदार आहे. ही बाब भाजप व काँग्रेस या दोघांनीही लक्षात घेण्याची आहे. एकूणच संपूर्ण लोकसभा मतदार संघात परिवर्तनाचा कौल असला तरी हा कौल काही प्रमाणात आमदारांप्रती असलेली नाराजी या ही बाबीला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्राचा विचार करता नवे मतदार नाग विदर्भ आंदोलन समितीमुळे भाजपकडे वळलेत. येथेही आमदारांप्रती अ‍ॅन्टी इनकंबन्शी निश्चितपणे आहे. काँग्रेस पक्षाला तसेच राष्टÑवादी काँग्रेस पक्षाला पक्षातील गटबाजी रोखता आली नाही. भाजपने या तुलनेत सरस काम केले. भाजपचा कुठलाही गट नेतेंच्या विरोधात गेला नाही. शिवसेनेची भक्कम साथ भाजपला मिळाली व भाजपचा विजय सुकर झाला. (जिल्हा प्रतिनिधी)