शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

मूलमध्ये काँग्रेस तर बल्लारपूर तालुक्यात भाजपचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदार संघातील बल्लारपूर तालुक्यातील १० पैकी भाजपने नांदगाव(पोडे), हडस्ती, कोर्टीमक्ता, पळसगाव, मानोरा, गिलबिली, कळमना व आमडी या आठ ग्रामपंचायतींवर तर किन्ही या ग्रामपंचायतीवर अपक्षाचा झेंडा फडकला असलातरी येथेही भाजपला उपसरंपचपद मिळाले आहे. विसापूर या मोठ्या ग्रामपंचायतीवर माजी जि. प. सदस्य रामभाऊ टोंगे यांच्या वंचित आघाडीने एकहाती सत्ता काबीज केली आहे.

ठळक मुद्देसरपंचपदाची निवडणूक : २९ पैकी भाजप- १३, काँग्रेस - ९, अपक्ष - ५, शिवसेना-१, वंचित आघाडी १ जागा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीनंतर आता सरपंचपदाच्या निवडणुकीला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी मूल तालुक्यातील १९ आणि बल्लारपूर तालुक्यातील १० अशा २९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचीनिवडणूक पार पडली. कुठे अविरोध गतर कुठे चुरशीची निवडणूक झाली. यामध्ये २९ मध्ये तब्बल १३ ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकाविला तर ९ नऊ ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपला ताबा मिळविला. अपक्षांनी ५, तर शिवसेना आणि वंचितने प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली आहे.आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदार संघातील बल्लारपूर तालुक्यातील १० पैकी भाजपने नांदगाव(पोडे), हडस्ती, कोर्टीमक्ता, पळसगाव, मानोरा, गिलबिली, कळमना व आमडी या आठ ग्रामपंचायतींवर तर किन्ही या ग्रामपंचायतीवर अपक्षाचा झेंडा फडकला असलातरी येथेही भाजपला उपसरंपचपद मिळाले आहे. विसापूर या मोठ्या ग्रामपंचायतीवर माजी जि. प. सदस्य रामभाऊ टोंगे यांच्या वंचित आघाडीने एकहाती सत्ता काबीज केली आहे.मूल तालुक्यातील १९ पैकी नऊ ठिकाणी काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. यामध्ये नांदगाव, चांदापूर, खालवसपेठ, येरगाव, राजोली, चिखली, मरेगाव, भादूर्णी, हळदी        या ग्रामपंचायतींचा समावेश               आहे. 

सरपंच निवडीने मूल व बल्लारपूर तालुक्यात जल्लोष

मानोरा  ग्रामपंचायतवर        भाजपचा झेंडाकोठारी : मानोरा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या जीवनकला बाबाजी ढोंगे या विजयी झाल्या. उपसरपंचपदी लहुजी बापूजी टिकले यांची वर्णी लागली.आमडी ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यातकोठारी : आमडी ग्रामपंचायतीवर भाजपाने सत्ता काबीज केली असून सरपंच म्हणून श्वेता गिरीधर कुळसंगे यांची निवड करण्यात आली.नांदगाव ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीचा झेंडासरपंचपदी हिमाणी वाकुडकर तर उपसरपंच सागर देऊरकर विजयी झाले.घोसरी :   मूल तालुक्यातील ग्रामपंचायत नांदगाव येथील सरपंच-उपसरपंच पदाची निवड पीठासीन अधिकारी ए. के. बाबर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सरपंचपदी हिमाणी दशरथ वाकुडकर तर उपसरपंचपदावर सागर गजानन देऊरकर यांची अविरोध निवड करण्यात आली. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या नांदगाव ग्रामपंचायत निवडणुकीत तीन गटांत चुरशीचा सामना झाला. दशरथ वाकुडकर यांच्या काँग्रेस-शिवसेनाप्रणीत  महाविकास आघाडीचे अनपेक्षितपणे सहा सदस्य निवडून आले.विसापूर ग्रा. पं. सरपंचपदी    वंचितच्या वर्षा कुळमेथेविसापूर :  तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीच्या वर्षा मच्छिंद्र कुळमेथे या किसान मजदूर काँग्रेसच्या सहकार्याने सरपंचपदावर विराजमान झाल्या. त्यांना १० मते मिळाली. विरोधातील भाजपा समर्थित सुवर्णा महिंद्र कुसराम यांना सात मते मिळाली. उपसरपंचपदासाठी दावेदार असणारे वंचित आघाडीचे माजी पं.स. उपसभापती अनकेश्वर मेश्राम यांचा नऊ मतांनी विजय झाला. त्यांच्याविरोधात उभे असणारे शिवसेनेचे प्रदीप गेडाम यांना ८ मते मिळाली.  नांदगाव पोडे येथे सरपंचपदासाठी चांगलीच रस्सीखेच झाली. सरपंचपदासाठी तीन उमेदवारांनी आवेदनपत्र भरले. त्यामध्ये भाजपाचे दोन गट व महाविकास आघाडीच्या एक यामुळे चांगलीच चुरस निर्माण झाली. पंचायत समिती सदस्य गोविंदा पोडे यांच्या गटाच्या प्राजक्ता अनिल उरकुडे या सरपंच झाल्या. त्यांना ५ मते मिळाली. त्यांच्याविरोधात उभी असणारी मनोहर देऊळकर गटाच्या त्यांची सून मंजू देऊळकर यांना ४ मते, माजी सरपंच मधुकर पोडे  समर्थित महाविकास आघाडी गटाच्या पुष्पलता वाढई यांना २ मते मिळाली. तर याच गटाच्या (महाविकास आघाडी) नीलिमा राहुल दुधे या उपसरपंच झाल्या. त्यांना सात मते मिळाली. एकंदरीत सरपंच उपसरपंच हे पोडे समर्थित गटाचेच झाले. हडस्ती येथे भाजपाच्या अंजली गुरुदास पारखी सरपंचपदावर विराजमान झाल्या. उपसरपंच नारायण भोयर हे बिनविरोध निवडून आले.

 

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूक