यावेळी शेतकरी संघटनेला नुकसान सहन करावे लागले असून, वनोजा या एकमेव ग्रामपंचायतमध्ये स्पष्ट बहुमत तर सहा ग्रामपंचायतीत काँग्रेस-भाजप-गोंडवाना-मनसे- वंचित इत्यादी पक्षांसोबत आघाडी करून बहुमत मिळविले. निवडणुकीपूर्वी केवळ तीन ग्रामपंचायतीत सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसने आठ ग्रामपंचायती काबीज केल्याने तालुक्यात काँग्रेस सरस ठरली आहे.
बॉक्स
ग्रामपंचायत व पक्षांचा दावा
तालुक्यातील शेरज बु.- काँग्रेस, हिरापूर - काँग्रेस व शेतकरी संघटना आघाडी, तळोधी - काँग्रेस, गाडेगाव - काँग्रेस, नांदगाव - काँग्रेस, भोयगाव - काँग्रेस, कढोली - काँग्रेस, सांगोडा - शेतकरी संघटना व काँग्रेस आघाडी, शेरज खु. - अविरोध, लोणी - भाजप, नोकारी - गोंडवाना व भाजप, नारंडा - भाजप, आवाळपूर - शे. संघटना-मनसे-गोंडवाना व वंचित, भारोसा-शेतकरी संघटना व बीजेपी, वनोजा-शेतकरी संघटना, कोडशी-शेतकरी संघटना व बीजेपी आघाडी, पिपरी-शेतकरी संघटना व बीजेपी युती असा दावा केला आहे.
तळोधी, भोयेगाव व कढोली या तीन मोठ्या ग्रामपंचायती काँग्रेसने शेतकरी संघटनेकडून हिसकावल्या असून, नारंडा व लोणी या दोन मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपला आपली सत्ता अबाधित राखता आल्याचे त्या-त्या पक्षाचे म्हणणे आहे.