शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जोरगेवारांच्या अशा भूमिकेने संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2022 05:00 IST

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून जोरगेवार यांनी ७० हजारांवर मताधिक्याने ही निवडणूक जिंकली. तेव्हापासूनच त्यांच्या  भूमिका बदलत असल्याचे बघायला मिळते. निवडून येताच त्यांच्यावर शिवसेना व भाजपने बाजी लावल्याची माहिती आहे. मात्र, जोरगेवार यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी समर्थनार्थ पत्र दिले. हे पत्र देतानाचे छायाचित्र व्हायरल होताच तमाम चंद्रपूरकरांनी त्यांच्यावर कमालीची नाराजी व्यक्त केली.

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गुवाहाटीला जाऊन सामील झाले. आमदार जोरगेवार यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवरून चंद्रपूरची जनता मात्र कमालीची संभ्रमात आहे.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून जोरगेवार यांनी ७० हजारांवर मताधिक्याने ही निवडणूक जिंकली. तेव्हापासूनच त्यांच्या  भूमिका बदलत असल्याचे बघायला मिळते. निवडून येताच त्यांच्यावर शिवसेना व भाजपने बाजी लावल्याची माहिती आहे. मात्र, जोरगेवार यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी समर्थनार्थ पत्र दिले. हे पत्र देतानाचे छायाचित्र व्हायरल होताच तमाम चंद्रपूरकरांनी त्यांच्यावर कमालीची नाराजी व्यक्त केली. जोरगेवार हे मूळचे भाजपचे होते. २००९ मध्ये चंद्रपूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांच्यात आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. मात्र भाजपने ऐनवेळी नागपूरचे नाना श्यामकुळे यांना उमेदवारी दिली आणि ते जिंकले. आता भाजपमध्ये राहून आमदार बनणे शक्य नाही म्हणून  जोरगेवार यांनी शिवसेनेत उडी घेतली आणि २०१४ ची निवडणूक लढली. ते निवडणूक हरले. मात्र, त्यांनी दुसऱ्या क्रमाकांची मते घेतली. २०१९ च्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येणे शक्य नसल्याचे गणित मांडून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. २०१९ च्या निवडणुकीकरिता त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. तरीही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेली रॅली अपक्ष म्हणून निघाली खरी. मात्र, वाहनांमध्ये काँग्रेसचे झेंडेही ठेवले होते. रॅली अर्ध्यात पोहोचल्यानंतर अचानक एबी फाॅर्म मिळाला म्हणून त्यांनी वाहनातील काँग्रेसचे झेंडे उंचावले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवारीसाठी चाचपणी सुरू होती. अखेर काँग्रेसचा एबी फाॅर्म रिजेक्ट झाला आणि अपक्ष म्हणून जोरगेवार निवडणूक रिंगणात राहिले. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आधी बाळू धानोरकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्याबद्दल भावनिक वातावरण तयार झाले होते. याची पुनरावृत्ती जोरगेवार यांच्याबाबतही झाली. जोरगेवारांना अपक्ष उमेदवार म्हणून सर्वस्तरारून जोरदार पाठिंबा मिळाला आणि ते मताधिक्याने विजयी झाले. निवडून आल्यानंतरही त्यांचा पक्षाचा शोध संपलेला नाही. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी तिकडे आपला मोर्चा वळविला. हे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसताच त्यांनी आपला मोर्चा शिवसेना बंडखोरांकडे वळविला. त्यांच्या या बदलत्या भूमिकांवरून चंद्रपूरची जनता मात्र कमालीची संभ्रमात आहे.

किशोर जोरगेवार म्हणतात...   अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारसोबत राहून मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासह विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करता आला.  त्यामुळे पुढेही चंद्रपूर मतदारसंघाचा सर्वसमावेशक विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा