शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जीएमसीमध्ये न्युओनेटल व्हेन्टिलेटरच्या खरेदीत घोळ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

कोरोना संकट काळातील दुसऱ्या लाटेमध्ये बालकांवर कोरोना संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यासाठी संपूर्ण राज्यभर बालरुग्णालय सज्ज करण्यात आले होते. दरम्यान, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागामध्येही अत्याधुनिक साधनसामग्री मागविण्यात आली. याच काळामध्ये येथे चार न्युओनेटल व्हेन्टिलेटर पुरवठादाराकडून पुरविण्यात आले आहे. मात्र, मागण्यात आलेले आणि पुरवण्यात आलेल्या व्हेन्टिलेटर यामध्ये अनेक त्रुटी असल्याचा संशय नागरिकांना आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ईसीआरसी-२ प्रोजेक्ट अंतर्गत न्युओनेटल व्हेन्टिलेटर खरेदी करण्यात आले आहे. मात्र, खरेदी करण्यात आलेल्या या व्हेन्टिलेटरच्या दर्जावरून आता संशय असून यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून माहिती अधिकारातून अनेकांनी माहिती मागितली आहे. एकाच विषयावरून अनेकांनी माहिती मागितल्यामुळे या खरेदीमध्ये मोठा घोळ झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.कोरोना संकट काळातील दुसऱ्या लाटेमध्ये बालकांवर कोरोना संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यासाठी संपूर्ण राज्यभर बालरुग्णालय सज्ज करण्यात आले होते. दरम्यान, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागामध्येही अत्याधुनिक साधनसामग्री मागविण्यात आली. याच काळामध्ये येथे चार न्युओनेटल व्हेन्टिलेटर पुरवठादाराकडून पुरविण्यात आले आहे. मात्र, मागण्यात आलेले आणि पुरवण्यात आलेल्या व्हेन्टिलेटर यामध्ये अनेक त्रुटी असल्याचा संशय नागरिकांना आहे. तांत्रिकदृष्टीने  ते योग्य नसल्याचेही आता बोलले जात आहे. विशेष म्हणजे, चार व्हेन्टिलेटर खरेदीसाठी एक कोटी रुपये मोजल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे काहींनी यासंदर्भात माहिती अधिकारातून माहिती मागून खरेदीतील बारकावे शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

काय आहे संशयपुरविण्यात आलेले व्हेन्टिलेटरसोबत आलेल्या ॲसेसरी योग्य नसल्याचा संशय आहे. तसेच कमी किमत असतानाही अधिक किमतीत खरेदी केल्याचे, तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे आरटीई कार्यकर्त्यांना संशय आहे. 

अडीच कोटींचे १० व्हेन्टिलेटर येणार?जिल्ह्याची लोकसंख्या आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भार बघता येथे अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहे. यासाठीच जिल्हा नियोजनमधून आणखी अडीच कोटी रुपये खर्चून १० व्हेन्टिलेटर खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीय