चंद्रपूर : १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांसाठी लसीकरण माेहीम सुरू करण्यात आली. मात्र, गराेदर, स्तनदा मातांच्या लसीकरणाबाबत शासनाकडून अद्याप कुठल्याही सूचना आल्या नाहीत. तसेच मासिक पाळीदरम्यान महिलांनी लस घ्यावी का, हा प्रश्नही कायम आहे. परंतु, जागतिक पातळीवरील संघटना लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे लसीकरणाबाबत गराेदर, स्तनदा मातांमध्ये संभ्रमावस्था आहे.
कोरोनाचे प्रभावी औषध म्हणून लसीकरण गरजेचे आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत २,४७,६१४ जणांनी लस घेतली आहे. यामध्ये पुरुष १,३३,०३०, तर १,१४,५८४ महिलांनी लस घेतली आहे. आता १८ वर्षावरील सर्वांनाच लस देणे सुरु झाले आहे. परंतु, यामध्ये गर्भवती, स्तनदा महिलांबाबत शासनाने सूचना जाहीर केल्या नसल्याने संभ्रम आहे.
बॉक्स
लसीकरणाची सद्यस्थिती
चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण दोन लाख ४७ हजार ६१४ नागरिकांचे काेराेना लसीकरण झाले. यामध्ये एक लाख २३ हजार १९५ जणांनी पहिला डाेस, तर १४ हजार १४७ जणांनी दुसरा डाेस घेतला..
४५ वर्षांवरील व्याधीगस्त ४१ हजार ९३२ जणांनी पहिला तर ३,१८९ जणांनी दुसरा डोस घेतला..
१९,५२६ हेल्थ केअर वर्कर यांनी पहिला डोस घेतला तर १२,४२६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंटलाईन वर्करमध्ये १० हजार ५३१ जणांनी पहिला तर ८,१४९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
१८ ते ४४ वर्षे वयाेगटातील जिल्ह्यातील एकूण ३,४९४ जणांनी पहिला डाेस घेतला.
बॉक्स
जागतिक पातळीवरील काही आरोग्य संस्थांनी गर्भवती, स्तनदा मातांना लसीकरण करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. परंतु, शासनाचे गर्भवती, स्तनदा मातांना काेराेनाची लस देण्याबाबत कुठलेही निर्देश नाहीत. त्यामुळे आपण अशा महिलांचे लसीकरण थांबविले आहे. परंतु, याव्यतिरिक्त महिला व युवतींनी नोंदणी करुन लसीकरण करणे, गरजेचे आहे. लसीकरणाने कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
- डाॅ. दीप्ती श्रीरामे, सहायक प्राध्यापिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर
कोट
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनोकॉलॉजी ओबस्टेट्रिक्स या संघटनेने गर्भवती महिला १६ ते २४ आठवड्यापर्यंत लसीकरण करु शकतात. तसेच स्तनदा मातासुद्धा लसीकरण करु शकतात, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्वच महिला लसीकरण करु शकतात. कोरोनासाठी लसीकरण प्रभावी असल्याने १८ वर्षावरील सर्वांनी नोंदणी करुन लसीकरण करणे गरजेचे आहे.
- डाॅ. पूनम नगराळे, स्त्रीराेगतज्ज्ञ,
चंद्रपूर