कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग
चंद्रपूर : धान उत्पादक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस, तसेच सोयाबीन पिके घेतली जातात. दरम्यान, वेचणी केलेला कापूस शेतकरी विक्रीसाठी आणत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश जिनिंगमध्ये गर्दी होत आहे.
--
लाॅन संचालकांना दिलासा
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर लग्न समारंभावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे लाॅन तसेच मंगलकार्यालय संचालकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, निर्बंध हटविण्यात आल्याने काही प्रमाणात का होईना, त्यांना दिलासा मिळाला आहे.
---
बेरोजगारांमध्ये नैराश्य
चंद्रपूर : मागील वर्षी कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. परिणामी त्यांना बेरोजगार व्हावे लागते. दरम्यान, जे पुणे, मुंबईला काम करण्यासाठी गेले होते. तेही परत आले आहे. या बेरोजगारांमध्ये नैराश्य पसरले आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची मागणी केली जात आहे.