चंद्रपूर : दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. मात्र नोकरीचे प्रमाण कमी झाल्याने बेरोजगारांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बेरोजगारांना व्यवसायाकडे वळविण्याच्या दृष्टिकोनातून सरकारकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन शिबिर राबविण्यात येतात. मात्र ग्रामीण भागात अशा सोयी उपलब्ध नाहीत.
वळण रस्त्यावर रेडियम लावावे
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. बांधकाम विभागाने ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्ते बांधकामाची गती मंदावली
चंद्रपूर : पहिल्या लॉकडाऊननंतर शहरातील काही रस्त्यांचे बांधकाम रखडले होते. मात्र, प्रशासनाने बांधकामाला परवानगी दिल्यानंतर शहरातील काही रस्त्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र कामाला गती नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यावरील खड्यांमुळे नागरिक बेजार
जिवती : तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गम भागात असलेल्या गावातील रस्त्यावरून जाणे तर जिकरीचे झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.