चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे वनविभागाचा डेपो आहे. डेपोतील इमारती व तेथील अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या इमारतींची अत्यंत दुरवस्था झाली आहे. महाराष्ट्र वानिकी प्रकल्पा अंतर्गत या निवासी इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. सन १९९८ मध्ये या निवासी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले.
आता या इमारतींना बरीच वर्षे झाली असतानाही कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही.
निवासी कर्मचाऱ्यांसाठी या इमारतीचे बांधकाम केले आहे. परंतु इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भिंतीला रंगरंगोटी, विद्युत इत्यादी बाबींचा अभाव असलेले कर्मचारी निवासी इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी येथील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
येथील डेपो हे पश्चिम चांदा वन प्रकल्प विभाग चंद्रपूर यांच्या अंतर्गत येते, हे विशेष.