शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

समारोपीय समारंभात गुंजले ‘स्वर गुरुकुंजाचे’

By admin | Updated: March 1, 2017 00:47 IST

गुरूकुंज आश्रमातील मानव सेवा छात्रालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम ‘स्वर गुरुकुंजाचे’ पाहून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर प्रभावित झाले.

राष्ट्रसंत साहित्य संमेलन : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोपचंद्रपूर : गुरूकुंज आश्रमातील मानव सेवा छात्रालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम ‘स्वर गुरुकुंजाचे’ पाहून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर प्रभावित झाले. मुक्तकंठाने या बाल कलाकारांचे कौतुक केले. महाराष्ट्र शासन आणि अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रमद्वारा कन्यका सभागृहात राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन झाले. समारोप ना. हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख, सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, उपाध्यक्ष पुष्पा बोंडे, माजी आमदार वामनराव चटप, सरचिटणीस जनार्दन बोथे, संमेलन समन्वयक डॉ. रघुनाथ वाडेकर, अ‍ॅड. दत्ता हजारे, लक्ष्मणराव गमे, पाटील गुरुजी, लक्ष्मण काळे महाराज, बबनराव वानखेडे, उषाताई हजारे, शोभाताई पोटदुखे, बंडोपंत बोढेकर, ज्ञानेश्वर मुळे, मनोहर पाऊणकर, रूपलाल कावळे आदी उपस्थित होते.गुरुकुंज आश्रमाचे सरचिटणीस बोथे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात संयोजक अमोल बांबल यांनी घेतलेल्या परिश्रमातून या बाल कलाकारांनी गुरुकुंज मोझरी ते दिल्ली असा यशस्वी दौरा करीत राज्य तसेच राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त केलेले आहे. राष्ट्रसंताच्या परिवर्तनवादी व राष्ट्रीय भजनाचा प्रचार प्रसार ही मंडळी शिक्षणासोबत करीत आहे. सर्व जातीधर्माचे विद्यार्थी गुरुकुंजात शिक्षण घेत आहेत.समारोपीय कार्यक्रमात आश्रमाच्या वतीने पुष्पा बोंडे यांनी शासनाकडे काही मागण्या केल्यात तेव्हा ना. अहीर यांनी त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. डॉ.वाडेकर यांनी संमेलनाच्या अभूतपूर्व यशाबद्दल समाधान व्यक्त केले. अ‍ॅड. हजारे यांनी आभार मानले. राष्ट्रवंदनेने समारोप करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)