दिलासाग्राम सोशल सर्व्हिस असोसिएशनचा उपक्रम
बल्लारपूर : दिलासाग्राम सोशल सर्व्हिस असोसिएशन, बल्लारपूर व जिल्हा चाईल्डलाईन, चंद्रपूर यांच्यातर्फे हनुमान मंदिर रामपूर येथे स्वतःची काळजी व सुरक्षा तसेच मानसिक स्वास्थ्य याबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला रामपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच हेमलता ताकसांडे, मार्गदर्शक दिलासाग्राम सोशल सर्व्हिस असोसिएशनच्या सहसंचालिका सिस्टर विवियाना, जिल्हा चाईल्डलाईन समन्वयक अमोल मोरे, समुपदेशिका दीपाली मसराम, प्रणाली इंदुरकर, चित्रलेखा मिश्रा, माया ठाकूर, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी दिलासाग्राम बालभवन टीमने बालकासोबत होणाऱ्या लैंगिक शोषणावर पथनाट्य सादर केले. टॅटू, स्वतःची काळजी व सुरक्षा आणि मानसिक स्वास्थ्याविषयी मोलाचा संदेश दिला. माया ठाकूर, सिस्टर विवियाना व हेमलता ताकसांडे यांनी महिलांचा आर्थिक विकास, बाळसुरक्षा व विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुण्याच्या हस्ते मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले. उषा गौतम यांनी प्रास्ताविक केले. रजनी पवार यांनी संचालन केले व कविता देरकर यांनी आभार मानले.