शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

मराठी चित्रपटांच्या यशाबाबत चिंताच !

By admin | Updated: April 27, 2016 01:01 IST

मराठीत चांगले आशयदान चित्रपट निघत आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळत आहेत.

अरुण नलावडे : मुलाखतीत व्यक्त केली मराठी चित्रपटांची व्यथावसंत खेडेकर बल्लारपूरमराठीत चांगले आशयदान चित्रपट निघत आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळत आहेत. आॅस्करपर्यंत त्यांनी धडक मारली आहे. हे सारे कौतुकास्पद आणि मराठी माणसांची छाती फुलावी, असे असले तरी त्यातील किती चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचतात आणि ते थिएटरात लागले तरी कितीजण बघतात हा चिंतेचा विषय आहे. आशयघनासोबत मराठी चित्रपटांची संख्याही वाढली. पण त्यांना आर्थिक यश मिळत नसेल. प्रेक्षकांपर्यंत ते पोहचत नसेल तर काय उपयोग, असा विचार लावणारा प्रश्न प्रसिद्ध निर्माता, निर्देशक आणि नट अरुण नलावडे यांचा आहे.अरुण नलावडे यांच्या दिग्दर्शनात ‘ताटवा’ हा चित्रपट बनत आहे. त्यात त्यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे तब्बल २० दिवस चालले. नलावडे यांचा या दरम्यान नवरगावलाच मुक्काम होता. ‘लोकमत’ने तेथे त्यांची मुलाखत घेतली. त्याप्रसंगी त्यांनी मराठी चित्रपटांबाबत वरील शब्दात चिंता व्यक्त केली. आपले भाषेवर प्रेम करण्याकरिता मराठी माणूस बराच मागे आहे. दक्षिण भारतात याहून वेगळे चित्र आहे. तेथील प्रेक्षक आपल्या मातृभाषेतील चित्रपट उचलून धरतात. त्यामुळे, तिकडील निर्माता व दिग्दर्शकांना आपला चित्रपट चालणारच अशी हमी असते. या विश्वासानेच ते चित्रपटांवर मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवितात. मराठीत तशी शाश्वती नाही.चित्रपट चालणार का, त्याला थिएटर मिळणार का, ही चिंता मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना लागलेली असते, असे सांगत नलावडे यांनी निर्माण केलेल्या व त्यात त्यांची आजोबाची भूमिका असलेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘श्वास’ ला पडद्यावर झळकविण्याकरिता कसे कष्ट घ्यावे लागले, याबाबत सांगितले. ‘श्वास’ हा वेगळ्या विषयाचा चित्रपट तयार झाला. पण त्याला कुणीच वितरक मिळेना. हा काय चित्रपट आहे? असे म्हणत तो घ्यायला सारेच नकार देऊ लागले. शेवटी आम्ही प्रोजेक्टरची व्यवस्था करुन गावोगावी फिरुन लोकांना वेगवेगळ्या क्तृप्त्यांनी जमवून त्यांना हा चित्रपट मोफत दाखवू लागलो. लोकांना तो आवडला. तोंडातोंडी त्याची प्रसिद्धी झाली. मग, थिएटरवाले त्याला थिएटरात लावायला तयार झाले. पुढे काय झाले हे आपण सारेजण जाणतातच! नलावडे हे मूळचे कोकणचे! सध्या एका मालिकेतून कोकणातील लोकांचा भूत पिशाच्यावर भयंकर विश्वास आह,े असे दाखविले जात आहे. यावर बोलताना ते म्हणाले, कोकणात ग्रामीण भागात तशी स्थिती आहे. पण, आता जागरुकता येऊन चित्र बदलत चालले आहे. नलावडे यांचे ४० वर्षापूर्वी रंगभूमीवर डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत पदार्पण झाले होते. अग्निपंथ या नाटकातील त्यांची भूमिका गाजली. श्वास हा त्यांचा पहिला चित्रपट, विदर्भात तयार झालेल्या ‘तानी’ या चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका केली होती. का रे दुरावा या मालिकेतील त्यांचा केतकर काका प्रेक्षकांना खूप आवडला. नागपूरचे प्रसिद्ध समजासेवी, विमल आश्रमात वेश्यांच्या मुलांना संस्कारित करीत असलेल्या रामभाऊ इंगोले यांच्या कार्यावर ‘वारसा‘ हा चित्रपट ते बनवित आहेत. त्यात ते रामभाऊचे पात्र करीत आहेत. संपूर्ण चित्रीकरण नागपुरातच होणार आहे. हे ऐकून आपले विदर्भावर बरेच प्रेम दिसते, असे विचारता ‘हो’ असे हसत म्हणाले. आपणाला कोणत्याही प्रकारची भूमिका करणे आवडते. खलनायकसुद्धा. असे सांगत कलाकाराने चौकटीत बंदिस्त राहू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.