शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

राष्ट्रीयकृत बॅंकाकडून विद्यार्थ्यांना पॅनकार्डची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 05:00 IST

विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणे कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यातच शालेय पोषणाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे बॅंक खाते काढणे अनिवार्य आहे. मात्र बॅंक खाते काढण्यासाठी पॅनकार्ड आणण्यासंदर्भात बॅंकांकडून सक्ती केली जात आहे. विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड काढून काही पालक आणत आहे.  पॅनकार्डमध्ये विद्यार्थ्यांचा फोटो राहत नसल्यामुळे बॅंकेकडून शाळेचे बोनाफाइड, आयकार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्र मागितल्या जात आहे.

ठळक मुद्देमजुरी सोडून पालकांच्या चकरा : बॅंकांच्या नियमामुळे डोकेदुखी वाढली

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्याने शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात शासनातर्फे जमा करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांचे बॅंक खाते काढणे अत्यावश्यक केले आहे. सध्या पालक विद्यार्थ्यांना घेऊन बॅंकेत खाते काढण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र बॅंकांनी विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड अनिवार्य केले आहे. परिणामी पालकांना आपली मजुरी सोडून या कामात गुंतून रहावे लागत आहे. जमापेक्षा खर्च जास्त, अशी काहीशी अवस्था सध्या पालकांची झाली आहे.विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणे कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यातच शालेय पोषणाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे बॅंक खाते काढणे अनिवार्य आहे. मात्र बॅंक खाते काढण्यासाठी पॅनकार्ड आणण्यासंदर्भात बॅंकांकडून सक्ती केली जात आहे. विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड काढून काही पालक आणत आहे.  पॅनकार्डमध्ये विद्यार्थ्यांचा फोटो राहत नसल्यामुळे बॅंकेकडून शाळेचे बोनाफाइड, आयकार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्र मागितल्या जात आहे. सर्व कागदपत्र गोळा करताना पालकांची  दमछाक होत आहे

शिक्षकांची झोप उडाली- विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून शाळेला सारखी विचारणा केली जात आहे. - मुख्याध्यापक शिक्षकांवर बॅंकखात्यासंदर्भात जबाबदारी देत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पालकांना बॅंक खाते काढण्यासाठी सांगत आहे. मात्र यामध्ये शिक्षकांची झोप उडाली आहे.

शालेय पोषणची रक्कम जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे बॅंक खाते अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र बॅंकांकडून विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड आणण्याचा तगादा लावला जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांना प्रथम पॅनकार्ड त्यानंतर बॅंक खाते काढावे लागत आहे. यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे. बॅंकांनी आधार कार्ड आणि शाळेच्या बोनाफाइडवर  विद्यार्थ्यांचे बॅंक खाते काढून देणे गरजेचे आहे.- स्मिता अनिल चिताडे मुख्याध्यापिका, महात्मा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर

जमा कमी खर्च अधिक

शालेय पोषणची रक्कम जमा करण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांचे बॅंक खाते अनिवार्य केले आहे. यासाठी बॅंकेत पॅनकार्ड मागितल्या जात आहे. बॅंक खाते काढणे, पॅनकार्ड काढण्यासाठी पैसा द्यावा लागत आहे. अनेवेळा मजुरी बुडवून शहरातील बॅंकेत जावे लागत आहे. शालेय पोषणची पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १५० ते १६० रुपये तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २५० रुपयांपर्यंत रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे बॅंक खात्यात जमा कमी आणि खर्च अधिक अशी अवस्था आहे. 

 

पालक म्हणतात.....

शालेय पोषण आहाराची रक्कम जमा करण्यासाठी शाळांकडून बॅंकेचे पासबुक काढण्यासाठी सांगितल्या जात आहे. मात्र बॅंक पॅनकार्ड आणल्याशिवाय पासबुक काढून देण्यास तयार नाही. विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड काढण्यासाठी अतिरिक्त खर्च होत असून, मजुरीही बुडत आहे. १५० रुपयांसाठी बॅंक खाते काढणे परवडण्यासाखे नाही. त्यामुळे शासनाने पालकांच्या खात्यातच पोषण आहाराची रक्कम जमा करावी.-किरण इटणकर,पालक

शिक्षक विद्यार्थ्यांचे बॅंक पासबुक काढण्यासाठी सांगत आहे. यामुळे आम्ही कामधंदे सोडून बॅंकेत जावून खाते काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅंकवाले विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड आणायला सांगत आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांचा नाईलाज होत आहे. शासन आणि बॅंकेच्या नियमामुळे पालक पिचल्या जात आहे.-हरिश्चंद्र  मारोती बुटले, पालक

 

टॅग्स :Pan Cardपॅन कार्डStudentविद्यार्थी