शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

किल्ला स्वच्छता अभियानाला वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:23 IST

इको-प्रो संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शहरातील ऐतिहासिक गोंडकालिन किल्ला-परकोट स्वच्छता अभियानाला गुरूवारी एक वर्ष पूर्ण झाले.

ठळक मुद्देश्रमदानाचे ३४८ दिवस : इको-प्रो संस्थेची मोहीम

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : इको-प्रो संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शहरातील ऐतिहासिक गोंडकालिन किल्ला-परकोट स्वच्छता अभियानाला गुरूवारी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने किल्ला-परकोटावरील विठोबा खिडकी ते बिनबा गेटमधील २५ व्या बुरूजाखाली उत्साहात कार्यक्रम पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास अभ्यासक आचार्य टी. टी. जुलमे, इको-प्रो चे बंडू धोतरे, डॉ. योगेश दुधपचारे, डा.ॅ मिलिंद जांभुळकर, संदीप जेऊरकर, रवी झाडे, धनजंय शास्त्रकार आदी उपस्थित होते.ऐतिहासिक गोंडकालिन किल्ले, गोंड राजांची समाधी आणि शिल्प कलेने नटलेल्या मंदिरांसाठी चंद्रपूर शहर प्रसिद्ध आहे. ७०० वर्षांपूर्वी बांधलेले गोंडकालिन किल्ले, परकोट आजही भक्कम व सुस्थितीत आहेत. या परकोटाची लांबी सुमारे ११ किमी लांब असून चार दरवाजे पाच खिडक्या आणि ३९ बुरूज आहेत. या ऐतिहासिक वारसाकडे दुर्लक्ष केल्याने झाडे-झुडपे वाढली.काही ठिकाणचा भाग खचला. परकोटावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे हा किल्ला व परकोटाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी १ मार्च २०१७ ला इको-प्रो संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियानाची सुरूवात केली होती. या मोहिमेला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात ३४८ दिवस प्रत्यक्ष श्रमदान करून किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली.हे अभियान केवळ किल्ल्याच्या स्वच्छतेपुरते मर्यादीत न राहता शहराच्या पर्यटन विकासाला चालना मिळले, या हेतूने बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे इको- प्रो संस्थेचे बंडू धोतरे यांनी वर्षपूर्ती कार्यक्रमानिमित्त सांगितले.अभियानात नागरिक व स्थानिक शासन, पुरातत्व विभागानेही सहभाग दर्शविला. किल्लाच्या दोन्ही बाजुस संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. किल्ला व संरक्षण भिंतीचा काही भाग पाथ वे तसेच सायकल ट्रॅककरिता विकसित केल्यास पर्यटनालाही चालना मिळू शकते. यासाठी इको- प्रो संस्थेने शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.गोंडराजे समाधीस्थळ परिसरात लाईट व साऊंडच्या माध्यमातून गोंड राजांचा इतिहास नागरिकांपर्यंत येवू शकतो. त्यासाठी मनपा, जिल्हा प्रशासन व नागरिकांनी या उपक्रमाला बळ द्यावे, अशी अपेक्षा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वर्षपूर्तीनिमित्त व्यक्त केली.यावेळी रवींद्र गुरनुले, नितीन बुरडकर, नितीन रामटेके, बिमल शहा, अनिल अडगुरवार, राजु काहिलकर, संजय सब्बनवार, अमोल उटट्लवार, सुधीर देव, हरिदास कोराम, किशोर वैद्य, हरिश मेश्राम, वैभव मडावी, रोशन धोतरे, विनोद दुधनकर, सुमीत कोहळे, आशिष म्हस्के, रामेडवार, प्रतीक बद्दलवार, सचिन धोतरे, हेमंत बुरडकर, कपील चौधरी उपस्थित होते.मोहिमेची व्याप्ती वाढविण्याचा संकल्पकिल्ला स्वच्छता अभियानाला एक वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून मान्यवरांच्या हस्ते केप कापण्यात आला. यांनतर उपस्थित पाहुणे आणि जनता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी किल्ला परिसराची पाहणी केली. ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता करण्यासोबतच अभियानाची व्याप्ती वाढविण्याचा संकल्प इको- प्रो संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांच्या सहकार्यानेमुळे ही मोहीम गतिमान होवू शकली. मोहिमेचा विस्तार करण्यासाठी शहरातील नागरिक व सामाजिक संस्था सहभागी झाल्यास पून्हा उत्तम कार्य होईल, अशी भूमिका उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.