शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जिल्ह्यात बहुतांश विकासकामांची पूर्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:19 IST

राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जिल्ह्यात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला असता मागील तीन वर्षांत बरीच कामे मार्गी लागल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देराज्य सरकारची तीन वर्षे पूर्ण : सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारातून जिल्ह्यात विकासाची वाट मोकळी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जिल्ह्यात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला असता मागील तीन वर्षांत बरीच कामे मार्गी लागल्याचे दिसून येते. याशिवाय जिल्ह्याला अनेक नाविण्यपूर्ण गोष्टीही मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, पुढील दोन वर्षांत आणखी महत्त्वाच्या योजना आणि विकासकामे हाती घेण्यात येईल. या कामांचाही जिल्ह्यातील नागरिकांना निश्चित फायदा होईल, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.भाजपाने सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. हा निर्णय चंद्रपूर जिल्हावासीयांसाठी, विशेषत: महिलांसाठी मोठा लाभदायक ठरला. चंद्रपूरला वैद्यकीय महाविद्यालय मिळाले. राज्य शासनाची जिल्ह्याला ही मोठी देण ठरली. चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह नावाचे एकमेव सांस्कृतिक मंच होते. या सभागृहाचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले. हे सभागृह कात टाकून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध झाले आहे. अंंध, अपंग व दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव वाटप मेळाव्यांना जिल्ह्यात प्रथमच सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील वनऔषधी, हळद, शिंगाडा, मशरुम व तांदूळ यासारख्या कृषी उत्पादनाचे ब्रँडींग मुंबई, दिल्लीच्या बाजार करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाच्या विविध योजनांमध्ये बचत गटांच्या महिलांना सहभागी करून त्यांचीही प्रगती साधण्यात आली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पर्यटन स्थळ बनविण्याची घोषणा करण्यात आली.चंद्रपूरची जीवनदायिनी इरई नदीची दुरवस्था झाली होती. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून या नदीचे खोलीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. हे काम अजूनही सुरूच आहे. शेतकºयांचे सुरक्षित सिंचन असलेल्या जिल्ह्यातील सर्व मामा तलावांच्या पुनरुज्जीवनाकरिता भरीव निधीची तरतूद करण्यात आली. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात विविध पायाभूत सुविधांच्या ६६ कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. २५० कोटी खर्चून सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर जिल्ह्यात सैनिक शाळा मंजूर करण्यात आली. बाबुपेठ उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक निर्णय घेत पाच कोटींचा निधी मंजूर केला. बल्लारपूर ते मुंबई रेल्वे सुरु करण्याची घोषणा करण्यात आली. पळसगांव-आमडीसह अन्य उपसासिंचन योजना सुरु करण्याचा शासनाचा निर्णय शेतकºयांना प्रफुल्लित करून गेला. विसापूरजवळ शंभर कोटींचे वनस्पती उद्यान तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. वरोरा येथे प्रशासकीय इमारत देण्यात आली. जिल्ह्यातील उद्योग भवनाचे लोकार्पण करण्यात आले. जंंगल भागातील महिला व पुरुषांना स्वंयरोजगारासाठी बांबु प्रशिक्षण व अन्य रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आला.गोंडवाना विद्यापीठात स्व.बाबा आमटे अद्यासन स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. बल्लारपूर येथे आदर्श पोलीस स्टेशनची निर्मिती, बल्लारपूर येथे पहिली मुलींची डिजिटल शाळा सुरु करण्याचा निर्णय नागरिकांसाठी फायद्याला ठरणार आहे. रामाळा तलाव सौंदर्यीकरण, वाहन स्थळ उभारण्यात आले. चंद्रपूर व बल्लारपूर येथे जागतिक दर्जाचे बसस्थानक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. आगरझरी अगरबत्ती विकास प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपुरात प्रथमच हिराई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. बफर क्षेत्रातील ४७ शाळा डिजिटल करण्यात येत आहे. ३३ कोटींच्या हडस्ती पुलाचे लोकार्पण करून चंद्रपूर थेट गडचांदूरशी जोडले गेले. मूल तालुक्यातील चिंचाळा व उथलपेठ या गावामध्ये आरो प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. चंद्रपूर-दाताळा येथील पुलासाठी ४९ कोटींची तरतूद करण्यात आली. बल्लारपूर क्षेत्रात ५०० कोटीची विकास कामे सुरु करण्यात आली. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील संपूर्ण रस्त्यांचे नुतनीकरण करण्याची घोषणा करण्यात आली. जलद गुन्हे तपासासाठी पोलीस मुख्यालयात सायबर लॅबची व्यवस्था करण्यात आली. पोलीस कॉलनीसाठी ९७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करण्यात आली. आदिवासी विभागामार्फत जिल्ह्यात आणखी १२ वसतिगृह उभारण्यात येत आहे.काही ठळक फायदेताडोबा येथे ५०० कोटींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णयचिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णयकोअर व बफर झोनमध्ये राहणाºया नागरिकांना जन-धन योजनेच्या सुविधा देणेचंद्रपुरात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी स्व. बाबा आमटे अभ्यासिका उभारली.महाराष्ट्र वनविकास मंडळाच्या माध्यमातून चंद्रपूरजवळ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम गार्डन उभारले.चंद्रपुरात अमृत योजनेतून २३१ कोटींच्या स्वयंचलित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन