शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामज्योती योजनेची कामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:42 IST

ग्रामीण भागातील प्रत्येकांच्या घरात विजेची सोय व्हावी, यासाठी महत्त्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना केंद्र सरकारने सुरू केली. मात्र ही कामे संथगतीने राबविली जात आहे. कालबद्ध वेळेत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदारांवर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिला.

ठळक मुद्देहंसराज अहीर : दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील प्रत्येकांच्या घरात विजेची सोय व्हावी, यासाठी महत्त्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना केंद्र सरकारने सुरू केली. मात्र ही कामे संथगतीने राबविली जात आहे. कालबद्ध वेळेत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदारांवर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिला. स्थानिक शासकीय विश्रामगृहात बुधवारी विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते.यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंता मस्के, अधीक्षक अभियंता (पायाभूत सुविधा) घोगरे, कार्यकारी अभियंता कुरेकार, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, राजू घरोटे, जि.प. सदस्य सुनिल उरकुडे, नरेंद्र जिवतोडे आदी उपस्थित होते. ना. अहीर म्हणाले, शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य वेळेत करून घेण्याची जबाबदारी वरिष्ठांवर असताना अधिकारी विकासात्मक कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ही कामे निर्धारीत कालावधीत होत नसल्याचे निदर्शनास येते. लोकांकडून तक्रारी केल्यानंतरही दखल घेतली जात नाहीे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विकासकामे करावीत. अधिनस्त अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा. कामे वेळेवर होत नसतील तर यासाठी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाºयांना दिली. मुख्य अभियंता भादीकर यांनी दीनदयाल उपाध्याय योजनेच्या अंमलबजावणीची माहिती सादर केली. विहित कालावधीत कामे पूर्ण करण्याचे आश्वासन या बैठकीत दिले.बेरोजगार अभियंत्यांची दखलबेरोजगार वीज अभियंत्यांची नोंदणी करण्याच्या सूचना ना. अहीर यांनी दिल्या. बेरोजगार वीज अभियंत्यांच्या प्रश्नांची दखल घेतली. त्यांना रोजगार उपलब्ध करण्याच्या गरजेवर या बैठकीत भर देण्यात आला. वीज वितरण कंपनीने अभियंत्यांची नोंदणी करावी. नोंदणीकृत बेरोजगार कामे उपलब्ध करू द्यावे, असेही ना. अहीर यांनी बैठकीत सांगितले.वीज खांबांची समस्या सुटणारकाही तालुक्यांचा महसुली विस्तार लक्षात घेता त्याठिकाणी स्वतंत्ररित्या वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय स्थापन करणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची सूचना ना. अहीर यांनी दिली. दरम्यान नागरिकांची गरज लक्षात घेवून तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीकरिता लवकरच सादर केले जाईल, असे आश्वासन मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी दिले. बाबुपेठ उड्डाण पुलासाठी विजेचे खांब २० दिवसांत स्थानांतरीत केले जाणार आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरelectricityवीज