शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘हॅलो चांदा’वरील प्रलंबित तक्रारी पूर्ण निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:39 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ‘हॅलो चांदा’ या चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राच्या कामात आणखी गती वाढविण्यात यावी.

ठळक मुद्देगती वाढविण्याचे निर्देश : पालकमंत्र्यांनी घेतला विभागवार आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ‘हॅलो चांदा’ या चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राच्या कामात आणखी गती वाढविण्यात यावी. केवळ तक्रारी सोडविण्याचे आश्वासन नव्हे तर सामान्य माणसाच्या चेहºयावर हसू फुलविण्याचे कौशल्य या टोल फ्री क्रमांकामध्ये असले पाहिजे, अशा शब्दात या नव्या प्रयोगाला देशात लोकप्रिय करण्याचे आवाहन वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्ह्याच्या प्रशासनात रुजू झालेल्या नव्या नियोजन भवनात ‘हॅलो चांदा’ या अभिनव प्रयोगाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाभरातील उच्चपदस्थ अधिकाºयांची सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाºयांची, या योजनेसाठी काम करणाºया तज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी १५ जुलैला सुरु झालेल्या अभिनव प्रयोगाचा आढावा यावेळी सादर केला.आतापर्यंत जवळपास पाच हजारावर नागरिकांनी हॅलो चांदावर संपर्क साधला आहे. नागरिकांमध्ये आपल्या सोयी सुविधांविषयी जागृता निर्माण होत आहे. या योजनेमध्ये काही अधिकाºयांनी झोकून देवून काम केले. तथापि अनेक ठिकाणी तक्रारी सोडविण्याची प्रक्रिया दिर्घकाळ रेंगाळत राहिल्याचेही त्यांनी नमूद केले.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी या नव्या प्रयोगातील सहभागाबद्दल अधिकाºयों कौतुक केले. केवळ कार्यवाही सुरु केली, हे दाखविण्यासाठी ‘हॅलो चांदा’ सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्या अधिकाºयांनी तक्रारी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला नाही किंवा ज्यांच्याकडून तक्रारी सोडविण्यात विलंब होत आहे, अशा अधिकारी, कर्मचाºयांवर गंभीरतेने कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले.या बैठकीला आ. नाना शामकुळे, अ‍ॅड.संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक नियति ठाकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते.१ हजार ७४६ तक्रारीदीड महिन्यामध्ये १७४६ तक्रारीपैकी ७५९ तक्रारी सोडविण्यात आल्या. उर्वरित तक्रारी महिन्याच्या आत सोडवण्याच्या अटीवर पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यापूर्वी अनेक लोकांचे मला शासकीय कामासाठी प्रत्यक्ष फोन येत होते. त्यांना प्रशासकीय कामासाठी ‘हॅलो चांदा’ ही एक दुसरी हेल्पलाईन निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसात प्रशासकीय कामासाठी थेट ‘हॅलो चांदा’ वरच समाधान होते. जिवतीपासून चिमूरपर्यंत सर्वसामान्य लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. पाच हजार लोकांना आपल्या कामांसाठी या यंत्रणेवर मोबाईल करावा वाटले. याचा अर्थ नागरिकांच्या समस्या आणखी जोमाने सोडविण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.