शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

विहित कालावधीत उद्दिष्ट पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:25 IST

राज्यामध्ये चंद्रपूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या विकासाकरिता असलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून विविध विभागाच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आढावा घेतला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : चांदा ते बांदा योजनेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यामध्ये चंद्रपूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या विकासाकरिता असलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून विविध विभागाच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आढावा घेतला. मागास जिल्ह्याच्या विकासासाठी ही योजना असून या योजनेतून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाची पूर्तता व गेल्या वर्षाच्या प्रकल्पाची पूर्तता तातडीने करावी, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाने चांदा ते बांदा योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाकरिता अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येत आहे. या निधीच्या माध्यमातून विविध विभागांमार्फत नाविन्यपूर्ण कामे पार पाडली जात आहे. अशा विविध विभागांच्या वेगवेगळ्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. यामध्ये टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासाकरिता राबवत असलेल्या समृद्ध किसान योजनेचा आढावा घेण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून शेतकºयाांना जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयामार्फत सिंचन विहीर, सामूहिक सिंचनासाठी विहीर आणि शेततळे, कृषी यंत्रे व अवजारे, पॉलिहाऊस, शेडनेट, मल्चिंग, ठिंबक सिंचन, जलसंधारण व पाणीपुरवठा विभागातर्फे कूपनलिका अशा विविध घटकांचा लाभ देण्यात येतो. तर पशुसंवर्धन विभागामार्फत उस्मानाबादी बोकड, पर्यटन विभागाच्या माध्यमातून पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून सौंदर्यीकरणाचे विविध कामे, पाटबंधारे विभागाची कामे, विविध विभागाचे विविध कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाºयांनी विहित कालमयार्देत कामे पूर्ण करावीत, विकास कामांच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे, जनसामान्यांच्या गरजेच्या दृष्टिकोनातून योजनेची आखणी करावी, निवडलेल्या संपूर्ण लाभार्थ्यांची यादी अद्यावत करून ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावी, असे निर्देश उपस्थित अधिकाºयांना दिले.कामे सोपवण्यात आलेली नोडल एजन्सी व देखरेख यंत्रणांनी नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम आखून सर्व प्रस्ताव पूर्ण करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी चांदा ते बांदा योजना सुनील धोंगळे, वन विकास विभागाचे गजेंद्र हिरे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग दशरथ पिपरे, शाखा अभियंता पाटबंधारे विभाग एस. सोनेकर, वी. ओचावार, खादी ग्रामोद्योग मंडळाचे भास्कर मेश्राम, आत्मा प्रकल्प संचालक रवींद्र मनोहरे, जलसंधारण विभाग कार्यकारी अभियंता एन. बावांगडे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी