शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सिमेंट रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:29 IST

नागभीड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु, कोरोनामुळे काही कामे बंद आहेत. तर ...

नागभीड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु, कोरोनामुळे काही कामे बंद आहेत. तर काही कामे कासवगतीने सुरू आहेत. आता रहदारी कमी असल्याने कामाला गती द्यावी, अशी मागणी आहे.

व्यावसायिकांकडून ग्राहकांची लूट

चंद्रपूर : ग्राहकांना वस्तू मोजून देणे व वजनानुसार बरोबर पैसे घेणे, ही व्यवहाराची पद्धत आहे, पण पैसे बरोबर देऊनही वजनात तूट निर्माण होण्याच्या प्रकारामुळे ग्राहक लुटले जात आहेत. लहान-मोठ्या विक्रेत्यांकडून सर्रासपणे अशी लूट सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी संबंधितांनी ग्रामीण, तसेच शहरी भागात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.

अंगणवाडी केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव

ब्रह्मपुरी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्राची दुरवस्था झाली असून, बालकांच्या पूर्व शालेय शिक्षणाची उपेक्षा होत आहे. आता कोरोनामुळे अंगणवाडी बंद असल्याने या अंगणवाडीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

व्यवसायासाठी कर्ज द्यावे

चंद्रपूर : महिला बचत गटांची संंख्या बरीच वाढली, परंतु स्वयंरोजगार उभे करण्यासाठी अपयश येत आहे. बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नसल्याने, महिला बचतगट अत्यंत छोट्या व्यवसायात अडकल्या आहेत. यातून पुरेसा आर्थिक मोबदला मिळत नाही. त्यामुळे महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बचत गटांना कर्ज देण्यात यावे, अशी मागणी बचत गटातील महिलांकडून करण्यात येत आहे.

धान उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत

सावली : यंदा अल्प उत्पादन झाल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच नुकत्याच खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली. त्यामुळे नव्या हंगामासाठी पैशाची तडजोड कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.

नियमबाह्य वाहतूक ठरतेय धोक्याची

चंद्रपूर : गावात नियमबाह्य व विना परवाना अल्पवयीन चालक अशा प्रकारच्या वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. लॉकडाऊन असल्याने रस्त्यावरील रहदारी कमी झाली आहे. त्यामुळे ही मुले वाहने सुसाट पळविताना दिसून येतात.

अनावश्यक सेवांनी मोबाईल धारक त्रस्त

चंद्रपूर : मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला आहे, पण कंपन्यांकडून अनावश्यक सेवांचा भडिमार ग्राहकांवर होत आहे. यामुळे मोबाईल धारक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित ग्राहक तक्रार केंद्राकडे केली जाते, पण त्याचा निपटारा होत नसल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहक वर्ग त्रस्त झाले आहे.

एटीएममध्ये नोटांचा तुटवडा

गोडपिपरी : शहरातील मुख्य मार्गावर एटीएम मशीन बसविण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक वेळा पैशाचा ठणठणाट दिसून येत आहे, तर कधी तांत्रिक अडचणीमुळे या एटीएम मशीन बंद असतात. त्यामुळे नागरिकांना रांगेत लागून पैसे काढावे लागत आहेत.

उमा नदीवरील पुलाची उंची वाढवा

सिंदेवाही : तालुक्यातील कळमगाव जवळील उमा नदीवर अस्तित्वात असलेला पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये पुलावरून पाणी जात असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या नदीवर पावसाळ्यापूर्वी नवीन पूल बांधण्याची मागणी केली जात आहे.

रोहयो कामांची संख्या वाढवावी

भद्रावती : तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. मात्र, कामांची संख्या कमी असल्याने अनेक जाॅबकार्ड धारकांना कामे मिळत नाहीत. सध्या शेतीपासून पुरेसा रोजगार नाही. त्यामुळे रोहयो कामांची संख्या वाढवावी.

बांबू अभावी बुरड कामगार अडचणीत

मूल : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र वनविभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली जात आहे.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी

चंद्रपूर : मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक स्रोत वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन तालुकानिहाय प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी आहे.

रस्त्यावरील झुडपे जीवघेणी

कोरपना : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामळे झुडपे तोडून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

घरकूल प्रकरणांचा निपटारा करावा

जिवती : तालुक्यातील रमाई आवास योजना व शबरी आदिवासी घरकूल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करूनही बरीच प्रकरणे प्रलंबित आहेत. मंजूर झालेली बांधकामे रेती अभावी अर्धवट आहे.

मैदानी खेळाबद्दल जनजागृती गरजेची

चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे. मात्र, सध्या मुले मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. मोबाईल गेमने हा ट्रेंडच बदलवून टाकला आहे. आता मुले मोबाईलवर विविध खेळ खेळताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैदानी खेळाची गरज आहे.

रस्त्यावरील पार्किंगमुळे नागरिक हैराण

मूल : गांधी चौक परिसरात रस्त्यावर वाहने पार्किंगसाठी ठेवली जातात. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली होती. पण कोरोनापासून कारवाई थंडावली. या मार्गावर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना मार्गक्रमण करताना त्रास होत आहे. यापूर्वी अनेकदा रस्त्यावरील पार्किंग हटविण्यासंदर्भात नागरिकांनी मागणी केली होती.