लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना जिनिंगमध्ये विकलेल्या कापसाचा चुकारा अद्यापही मिळाला नाही. परिणामी लॉकडाऊनमध्ये अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरीत मोबदला त्वरीत देण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.पोंभुर्णा तालुक्यात मागील वर्षी अनेकांनी कापसाची लागवड केली होती. उत्पन्न झालेला कापूस वणीच्या जिनिंगमध्ये विकला. परंतु, अनेक शेतकऱ्यांना विक्रीचा मोबदला अद्यापही मिळाला नाही. शेतकऱ्यांनी याबाबत क्षेत्र अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, शासनाकडुन निधी न आल्यामुळे मोबदला प्रलंबित असल्याचे सांगितले. मात्र लॉकडाऊनमुळे पूर्वीच अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबित मोबदला त्वरीत देण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या नेतृत्वात परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार, तालूका अध्यक्ष आकाश तिरूपतीवार, मनविसे तालुका अध्यक्ष आशिष नैताम, अमोल ढोले, उपाध्यक्ष राजेश गेडाम, तबरेज कुरेशी, रोशन भडके, अमित भडके आदी उपस्थित होते.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोबदला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:01 IST
पोंभुर्णा तालुक्यात मागील वर्षी अनेकांनी कापसाची लागवड केली होती. उत्पन्न झालेला कापूस वणीच्या जिनिंगमध्ये विकला. परंतु, अनेक शेतकऱ्यांना विक्रीचा मोबदला अद्यापही मिळाला नाही. शेतकऱ्यांनी याबाबत क्षेत्र अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, शासनाकडुन निधी न आल्यामुळे मोबदला प्रलंबित असल्याचे सांगितले. मात्र लॉकडाऊनमुळे पूर्वीच अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोबदला द्या
ठळक मुद्देतहसीलदारांना साकडे : लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत