शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तुकूम शिवारात भरदिवसा पट्टेदार वाघाचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:54 IST

चिमूर तालुक्यातील तुकुम येथे अनेक दिवसांपासून वाघाचे दर्शन होत आहे. अशातच गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान तुकुम येथील तलावात कपडे धुणाऱ्या महिलांना झुडपात पट्टेदार वाघ दिसला. लगेच याची गावकऱ्यांना माहिती देण्यात आली आणि पट्टेदार वाघाला पाहण्याकरीता एकच गर्दी उसळली.

ठळक मुद्देबघ्यांची उसळली गर्दी : वन विभाग दोन तास उशिरा आले

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ बु : चिमूर तालुक्यातील तुकुम येथे अनेक दिवसांपासून वाघाचे दर्शन होत आहे. अशातच गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान तुकुम येथील तलावात कपडे धुणाऱ्या महिलांना झुडपात पट्टेदार वाघ दिसला. लगेच याची गावकऱ्यांना माहिती देण्यात आली आणि पट्टेदार वाघाला पाहण्याकरीता एकच गर्दी उसळली. माहिती देऊनही वनविभागाचे कर्मचारी दोन तास विलंबाने आले. त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.तुकूम परिसरात अनेक दिवसांपासून पट्टेदार वाघ आढळून येत आहे. सोमवारी दयाराम गजभिये यांच्या शेतामध्ये अशोक विठोबा खिरडकर यांच्या गायीला पटेदार वाघाने ठार केले. यापूर्वीही दिलीप सुर यांची गाय ठार केली.दोन महिन्यांपासून परिसरात पट्टेदार वाघ वास्तव्य करीत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण दिसून येत आहे.ताडोबाच्या कोलारा प्रवेशद्वारापासून जवळच तुकूम तलाव परिसरात पट्टेदार वाघ दिसल्याने लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तलावावर कपडे धुणाºया महिलांना व ईश्वर शेडामे यांना हा वाघ दिसल्यानंतर त्यांनी गावकºयांना माहिती दिली.गावकऱ्यांनी आता वाघाला बघण्यासाठी गर्दी केली असून, वनविभाग व पोलीस विभाग या वाघावर लक्ष ठेवून आहे.वाघाचा बंदोबस्त करातुकुम परिसरात अनेक दिवसांपासून पटेदार वाघ वास्तव्य करीत असून अनेकांच्या शेतामध्ये गायीची वाघ शिकार करीत आहे. ताडोबा कोलारा गेटचा रहदारीच्या मुख्य मार्गावर अनेकाना वाघ दिसत आहे. त्यामुळे परिसरात शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, महिलांमध्ये दहशतीचे वातावरण दिसून येते. वन विभागाने वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल