शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांचे मनोबल उंचावण्यास कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:38 IST

देशाच्या सीमेवर तणाव स्थिती व युद्ध असे दोन प्रकार घडतात. मात्र, अशा अप्रिय घटनांमध्ये आपल्या सेनेची क्षती होऊ नये, हा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. सैनिकांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्या सोयी-सुविधांत वाढ व्हावी याकरिता २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे प्रतिपादन : बल्लारपुरात सैनिकांना मानवंदना

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : देशाच्या सीमेवर तणाव स्थिती व युद्ध असे दोन प्रकार घडतात. मात्र, अशा अप्रिय घटनांमध्ये आपल्या सेनेची क्षती होऊ नये, हा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. सैनिकांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्या सोयी-सुविधांत वाढ व्हावी याकरिता २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.बल्लारपूर येथील महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आयोजित सैनिकांना मानवंदनाच्या ‘सलाम सैनिक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. येथील श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था, लक्ष्य बहुउद्देशिय संस्था व संत गाडगेबाबा वाचनालयाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील सैनिक परिवार मित्रचे हिरालाल यादव होते. अध्यक्षस्थानी ना. अहीर तर प्रमुख अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, तहसीलदार विकास अहीर, ठाणेदार प्रदीप शिरस्कर, संजय कायरकर, प्राचार्य ज्योती भूते, माजी नगराध्यक्ष लखनसिंह चंदेल आदी उपस्थित होते.यावेळी जवानांच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहून त्यांना सलामीने अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केल्यानंतर यादव तसेच ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. श्रीनिवास सुंचूवार यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद केली. संचालन प्रा. मनिष कायरकर व आभार इजाज शेख यांनी मानले.