शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:55 IST

दलित वस्त्यांना सर्वांगीण सुविधा देवून विकास करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. त्याअंतर्गत आ. नाना श्यामकुळे यांनी मोठा निधी खेचून आणत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कामगार झोपडपट्टी प्रभागातील दलित वस्तीमध्ये कोट्यावधीची कामे सुरू आहेत. त्यामुळे दलित वस्तीचे स्वरूपच बदलत असून आपण दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दलित वस्त्यांना सर्वांगीण सुविधा देवून विकास करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. त्याअंतर्गत आ. नाना श्यामकुळे यांनी मोठा निधी खेचून आणत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कामगार झोपडपट्टी प्रभागातील दलित वस्तीमध्ये कोट्यावधीची कामे सुरू आहेत. त्यामुळे दलित वस्तीचे स्वरूपच बदलत असून आपण दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दलित वस्त्यांच्या सर्वांगीण विकास कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपूर विधानसभा कामगार झोपडपट्टी प्रभागातील अनेक सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, बालकल्याण सभापती जयश्री जुमडे, झोन सभापती अजय सरकार, नगरसेवक अमजद अली इरानी, नगरसेविका संगीता भोयर, समाज कल्याण विभाग उपायुक्त प्रसाद कुळकर्णी, कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग संतोष जाधव आदी उपस्थित होते.आमदार नाना श्यामकुळे यांनी विकास कार्याचा आढावा घेत दलित वस्तींच्या विकासासाठी तसेच अन्य ठिकाणी सर्व सोयींनी युक्त असा विकास करण्यासाठी पुन्हा निधी खेचून आणू असे आश्वासन दिले. भाजपच्या राजवटीत या शहराचा सर्वकष विकास होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महापौर अंजली घोटेकर यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर १० ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.