शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिपरीच्या विकासासाठी कटिबद्ध

By admin | Updated: January 14, 2017 00:39 IST

विकासापासून कोसो दूर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा हेतु तसेच चंद्रपूर भूमीपुत्र या नात्याने अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्राला विकास गंगेच्या प्रवाहात....

सुधीर मुनगंटीवार : भाजपचा वचनपूर्ती मेळावागोंडपिपरी : विकासापासून कोसो दूर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा हेतु तसेच चंद्रपूर भूमीपुत्र या नात्याने अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्राला विकास गंगेच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते गोंडपिपरी येथे आयोजित वचनपूर्ती सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आ. अ‍ॅड. संजय धोटे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी जि.प. अध्यक्ष संतोष कुंभरे, तालुकाध्यक्ष बबन निकोडे, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते दीपक बोनगीरवार, रवी पावडे, नगरपंचायत उपाध्यक्ष चेतनसिंह गौर, सभापती राकेश मून, प्रवीण नरहरशेट्टीवार, निर्मला खेवले, नगरसेवक अश्वीन कुसनाके, सुरेश चरडे, सपना साखलवार, किरण नगारे, पुणेकर आदी उपस्थित होते.ना. मुनगंटीवार म्हणाले की, राजकारण हे सत्तेपुरते न ठेवता सत्यासाठी करावे. गेली १५ वर्षूे सत्ता उपभोगलेले ज्यावेळी आमच्यावर निष्क्रीयतेचे आरोप करतात, त्यांना आत्मचिंतनाची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. बल्लारशा ते गोंडपिपरी चोपदरीकरणासह सिमेंट रस्ता होईल. तसेच मागेल त्याला विहिरी, सिंचनाच्या सुविधा देऊ असेही ते म्हणाले.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले की, तालुक्याच्या सीमावर्ती भागात चवेला धरण निर्मितीमुळे भीतीचे वातावरण पसरले होते. त्यातून सीमावर्ती भागातील नागरिकांची सुटका झाली असून चवेला धरणाची उंची कमी केल्याने कुठलेही गाव बाधीत होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आ. अ‍ॅड. संजय धोटे यांनी विरोधी पक्ष काँग्रेसच्या माजी आमदारांनी सत्तेच्या केलेला दुरूपयोगाची उदाहरणे देऊन माजी आमदारांच्या स्वस्वार्थीपणाच्या सक्रीयतेवर निशाना साधला. तर भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी आगामी होऊ घातलेल्या जि.प. व प.स. निवडणुकीसाठी तत्पर असल्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन सचिन फुलझेले, प्रास्ताविक नगराध्यक्ष संजय झाडे तर आभार उपाध्यक्ष चेतनसिंह गौर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)