शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आयो जाओ घर तुम्हारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST

रिॲलिटी चेक चंद्रपूर : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या आहे. ...

रिॲलिटी चेक

चंद्रपूर : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे. मात्र आजही कुठेच नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, रेल्वे स्टेशन, बसस्थानक एवढेच नाही तर जिल्हा सीमाही मोकळ्याच आहे. त्यामुळे ‌आओ जाओ घर तुम्हारा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात सध्या हजारावर रुग्णसंख्या पोहचली असून आजपर्यंत एकूण रुग्णसंख्या २५ हजारावर गेली आहे. विशेष म्हणजे, ४०६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे कोरोनासंदर्भात काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यातच जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या यवतमाळ तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. या जिल्ह्यांमध्ये लाॅकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. नागपूर येथे तर लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, जिल्हा सीमांवर तपासणी करणे तसेच येथील गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मात्र कुठेही नियम पाळल्या जात नसल्याचे बघायला मिळत आहे. रेल्वे स्टेशनवर काही ठिकाणी तपासणी केंद्र उघडण्यात आले आहे. मात्र प्रत्येक प्रवाशांची तपासणी केलीच जात नसल्याचे दिसते. त्यामुळे कोरोनाचा जिल्ह्यात संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स

बसस्थानकावर गर्दी वाढली

औद्योगिक शहर असलेल्या चंद्रपूरमध्ये बाहेर राज्यातील तसेच विदर्भातील नागरिकांची सारखी वर्दळ असते. त्यातच सध्या लग्नसमारंभाचा हंगाम आहे. त्यामुळे बसस्थानकावर गर्दी बघायला मिळत आहे. मात्र येथे कुठेच प्रवाशांना विचारपूस किंवा तपासणी केली जात नाही.

बसस्थानक परिसरात असलेल्या खुर्च्यांवर दाटीवाटीने बसून प्रवासी बसची वाट बघत असल्याचे दिसते.

रेल्वेस्थानकावर तपासणी नाही

चंद्रपूर तसेच बल्लारशा रेल्वे स्थानकावर प्र‌वाशांची संख्या मोठी आहे. बल्लारपूर येथे तर जंक्शन असल्यामुळे प्रत्येक रेल्वेगाड्या थांबतात. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकांची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र अपवाद सो़डला तर तपासणी केली जात नसून प्रवाशांची कुठेही नोंदणी सुद्धा होत नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे, तिकीट खिडकीजवळही मोठ्या प्रमाणात प्रवासी गर्दी करीत आहे. त्यांना गर्दी टाळण्यासंदर्भातही कुठेच आवाहन केले जात नाही.

जिल्हासीमा सर्वांसाठी मोकळ्या

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरु आहे. मात्र कोरोनासंदर्भात कोणालाच सध्यातरी अडविले जात नसल्याचे चित्र आहे. अपवादाला घुग्घुस तसेच चंद्रपूर-नागपूर रोडवरील सीमांवर पोलीस कर्मचारी असतात. मात्र ते दारुबंदीबाबत तपासणी करतात. अन्य सीमा सर्वांसाठी खुल्या आहेत.

बाॅक्स

वाढत्या संसर्गात काय उपाययोजना

जिल्ह्यात सध्यास्थितीत रुग्णसंख्या हजारावर पोहचली आहे. मात्र सध्यातरी लाॅकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात आला नाही. दरम्यान, हाॅटेल, तसेच चित्रपटगृहांमध्ये ५० टक्के क्षमतेचे चालविण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सोबतच बाधितांच्या घरासमोर फलक लावण्यात येणार असून सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. विवाह समारंभाला परवानगी घेतल्यानंतर ५० जणांना उपस्थित राहता येणार असून अंत्यविधीसाठी २० जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. नियमांचा भंग केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.