शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली तेंदूपानांचे संकलन

By admin | Updated: May 27, 2014 23:37 IST

एका महिन्यासाठी का होईना हजारो कुटुंबांना रोजगार देणार्‍या तेंदूपान तोडाईच्या व्यवसायाला चंद्रपूर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र मजुरांना वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली जंगलात तेंदूपत्ता

विरुर (स्टे) : एका महिन्यासाठी का होईना हजारो कुटुंबांना रोजगार देणार्‍या तेंदूपान तोडाईच्या व्यवसायाला चंद्रपूर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र मजुरांना वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली जंगलात तेंदूपत्ता तोडण्याचे काम करावे लागत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये तेंदूपत्ता गोळा करण्याच्या व्यवसायाला सुरूवात होते. उन्हाळा आला की, तेंदूपान कंत्राटदाराकडून कधी बोलावणे येते, याची अनेक कुटुंबे चातकासारखी वाट बघतात. ग्रामीण भागात उन्हाळ्यात शेतीची कामे संपल्याने मजुरांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये तेंदूपाने गोळा करण्याचा व्यवसाय अविरत सुरु आहे. यासाठी वन विभागाच्या प्रत्येक कार्यालयात तेंदूविभाग सुरू करण्यात आला आहे. या भागात तेंदू हंगामाला मे महिन्यात प्रत्यक्ष सुरुवात होते.

१५ ते २0 दिवसांचा हा हंगाम असतो. त्यानंतर आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील बडे कंत्राटदार आदिवासीबहुल भागात लिलावासाठी दाखल होतात. वनविभागाने तेंदू युनिटचा लिलाव केल्यानंतर मे महिन्यात तेंदू संकलनाच्या कामाला सुरुवात होते. शेतीच्या हंगामाच्या काळात शेतीवर राबायचे व उन्हाळ्यात मात्र दिवसभर या तोडाईच्या कामात स्वत:ला गुंतवून घेऊन चार पैसे जमवायचे, असा क्रमच जणू ठरलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो कुटुंब जादा पैसे मिळावे, म्हणून या तेंदू संकलनाच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातही सक्रीय होतात. मात्र येथे काम जास्त व दाम कमी अशी स्थिती असते.

सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू असल्याने हजारो मजूर पहाटेपासून आपल्या मुलाबाळांसह जंगलात पाने आणण्यासाठी जात आहेत. मात्र त्यांना अनेक वन्यप्राण्यांचा सामना करावा लागतो.

मागील वर्षापासून वाढलेले वन्यप्राण्यांचे हल्ले लक्षात घेता, मजूर जीव मुठीत घेऊनच तेंदूपाने संकलनाचे काम केले जात आहे. वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली मजूर हे काम करीत आहेत. मात्र परिस्थितीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना हे काम करावे लागत आहे. ईकडे आड, तिकडे विहीर अशी मजुरांची स्थिती झाली आहे. (वार्ताहर)