शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

घरांची व गुरांच्या गोठ्याची पडझड; शेकडो नागरिक अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 13:18 IST

घरे कोसळली : पंचनामेही झाले; मात्र नुकसानभरपाईचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठी झळ पोहोचली असून अनेकांच्या घरांची व गुरांच्या गोठ्याची पडझड झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तालुका प्रशासनाने अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ पंचनामे केले. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याने नागरिक नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे.

मूल तालुक्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीचा जास्त फटका बसला. अनेकांची घरे पडल्याने त्यांच्या निवाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला. नागरिकांना निवाऱ्यासाठी इतरत्र शोधाशोध करावी लागली. अनेकांच्या घरातील अन्नधान्य भिजल्याने वेळेवर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, तर गुरांच्या गोठ्याची पडझड झाल्याने गुरे रस्त्यावर बांधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. तालुका प्रशासनाने आपल्या अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ पंचनामे केले. मात्र, पंचनामे करून बराच कालावधी लोटूनही नुकसानभरपाई न मिळाल्याने नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये शासानाप्रती तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. प्रशासनाने त्वरित भरपाई द्यावी. 

इतक्या घरांची पडझड तालुक्यात झालेल्या अतिवष्टीमुळे जवळपास ७४० घरांची, तर ६० गुरांच्या गोठ्यांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून तत्काळ नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र, बराच कालावधी लोटूनही अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही.

"अतिवृष्टीमुळे माझी झोपडी पडली. घरातील अन्नधान्य पूर्णतः भिजले. त्यामुळे माझे मोठे नुकसान झाले असून माझ्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने पंचनामे केले. मात्र, अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी." - राजेंद्र वेट्टी, नुकसानग्रस्त लाभार्थी

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर