शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणींमुळे घोंगावतेय जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:40 IST

वेस्टर्न कोलफिल्ड लिमीटेडच्या कोळसा खाणीत दररोज पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने कोळसा खाण परिसरातील गावागावात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. गावकऱ्यांची तहाण भागविणाऱ्या बोअरवेलही आटायला लागल्याने गोवरी परिसारातील गावागावात जलसंकट निर्माण झाले असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाण्याचा प्रचंड उपसा : बोअरवेलही लागल्या आटायला

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वेस्टर्न कोलफिल्ड लिमीटेडच्या कोळसा खाणीत दररोज पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने कोळसा खाण परिसरातील गावागावात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. गावकऱ्यांची तहाण भागविणाऱ्या बोअरवेलही आटायला लागल्याने गोवरी परिसारातील गावागावात जलसंकट निर्माण झाले असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, माथरा, अंतरगाव, चिंचोली, मानोली, बाबापूर परिसरात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणींचे जाळे आहे. वेकोलिच्या कोळसा खाणी ३०० ते ४०० फुट खोल आहे. या कोळसा खाणीत दिवसरात्र पाण्याचा प्रचंड उपसा करण्यात येत असल्याने गोवरी परिसरातील व शिवारातील बोअरवेलला पाणी येत नाही. कोळसा खाणींनी पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याने यंदा पाण्याची भिषण टंचाई होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. उन्हाळ्यापूर्वीच नदी, नाले, तलाव कोरडे पडल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. गोवरी परिसरात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणींमुळे गावागावात जलसंकट घोंगवयाला सुरूवात झाली आहे. पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना ४३ अंश सेल्सिअसच्या तापमानात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. वेकोलित होणाºया शक्तीशाली ब्लास्टिंगमुळे बहुतांश बोअरवेल खचल्याने अनेक बोअरवेलला पाणी येत नाही तर काही बोअरवेल व विहीरी नावापुरत्याच उरल्या आहेत.शेतकऱ्यांनी सिंचनासाठी शेतात बोअरवेल खोदल्या. मात्र वेकोलिच्या शक्तीशाली स्फोटांनी बोअरवेल पूर्णत: खाली गेल्याने शेतकºयांना त्यांचा मोठाा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहै. पूर्वी वेकोलि परिसरातील गावात पाणी टचांई नव्हती. परंतू कोळसा खाणीे निर्माण झाल्यापासून पाण्याची पातळी अक्षरश: खाली गेल्याचे खाण परिसरातील गावातील प्रकल्पग्रस्त जाणकार नागरिक सांगतात. कोळस खाणींनी पाण्याची पातळी कमालीची घटल्याने गोवरी परिसरातील गावागावात भविष्यात भीषण पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे.वेकोलिचे दुष्परिणाम गावकऱ्यांच्या माथीवेकोलिच्या कोळसा खाणी निर्माण झााल्यापासून प्रकल्पग्रस्त गावातील नागरिकांना वेकोलिचे दुष्परिणाम सहन करावे लागत आहे. मात्र प्रशासनाने आजपर्यंत गावकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही, हे येथील नागरिकांचे दुर्दैव आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई