मागील पाच दिवसांपासून गुंफा गोंदेडा महोत्सव हा शासनाच्या कोविड १९च्या नियमांना बांधिल राहून, अगदी अल्प गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत ग्राम व परिसर स्वच्छता, सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, रामधून, भजने, कीर्तन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गुरुवारी भोजराज कामडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रामधूनच्या महत्त्वावर ग्रामगीताचार्य प्रा.राम राऊत यांनी मार्गदर्शन केले. काळे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कीर्तनाचे कार्यक्रम झाले. यानंतर, मार्गदर्शन व गोपालकाल्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली.* या कार्यक्रमाला माजी आमदार मितेश भांगडिया, आ. कीर्तिकुमार भांगडिया, लक्ष्मणराव गमे, जनार्धन बोथे, भोजराज कामडी, नत्थू भोयर, रूपलाल कावळे, प्रशांत अदनसरे, पांडुरंग अडसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ.भांगडिया यांनी आपल्या मार्गदर्शनात तपोभूमी गोंदेडाचा विकास करण्यास कटिबद्ध असून, या तपोभूमीला वृंदावनसारखे करणार, असे आश्वासन दिले. राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.* प्रास्ताविक सावरकर यांनी केले. संचालन गुरनुले यांनी केले.
राष्ट्रसंताच्या तपोभूमी गुंफा गोंदेडा महोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST