बल्लारपूर : येथील बस स्थानकासमोरील एका हॉटेल व्यवसायिकांने सांडपाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही. परिणामी बँकेच्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला अवगत करूनही लक्ष दिले नाही. बँकेच्या परिसरात पसरलेल्या दुर्गंधीने ग्राहकही त्रस्त झाले आहेत.येथील गणपती वॉर्डात दोन राष्ट्रीयकृत बँक आहेत. यामुळे बँकेचा व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीच्या सामना करावा लागत आहेत. जवळच बस स्थानक असल्याचे ये- जा करणाऱ्या नागरिकांनाही दुर्गंधीच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात हॉटेल व्यावसायिक व्यवसाय करतात. परंतु हॉटेलमधून सांडपाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. यामुळे या परिसरातील नागरिक सांडपाण्याच्या दुर्गंधीने बेजार झाले आहेत. देशपातळीपासून शहर व गाव पातळीवर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. राज्यातही स्वाईन फ्लू आजाराने थैमान घातले आहे. अशातच येथील सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे येथे सदर आजार फोफावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथील बँकेत नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. बँकेचे अधिकारी व कर्मचारी वर्गही दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. करण्यात आली.(शहर प्रतिनिधी)
बल्लारपुरात स्वच्छतेची ऐसीतैसी
By admin | Updated: February 19, 2015 00:49 IST